मानसी नाईकने दिली प्रेमाची कबुली

मराठीतील अनेक भन्नाट गाण्यांवर ताल धरून आपल्या दिलखेचक अदांनी रसिकांना घायाळ करणाऱ्या मानसी नाईकने प्रेमाची कबुली दिली आहे. सोशल मीडियावर बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबतचा फोटो पोस्ट करत मानसीने तिचं प्रेम जगजाहीर केलं आहे. वाढदिवसानिमित्त स्वत:लाच मी प्रेमाची भेट देत आहे, असं म्हणत मानसीने प्रदीपसोबतचा फोटो पोस्ट केला आहे. प्रदीपनेही त्याच्या इन्स्टाग्रामवर मानसीसाठी भावनिक मेसेज लिहिला आहे.
‘माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी व्यक्ती यावी आणि तिने मला सांभाळून घ्यावं याच्याच प्रतीक्षेत मी होतो. मला माझ्यासारखीच प्रेमळ व्यक्ती सापडली आहे. आपल्या आवडीनिवडीसुद्धा एकसारख्याच आहेत. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर मी तुझी साथ देईन’, असं प्रदीपने मानसीसाठी लिहिलं आहे.
प्रदीप हा प्रोफेशनल बॉक्सर आहे. प्रदीप वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत आशिया गटातलं विजेतेपद मिळवलेलं आहे. तर मानसीच्या नृत्यकौशल्याची तरुणाईमध्ये फार क्रेझ आहे. ती सोशल मीडियावर बऱ्याचदा आपला डान्स आणि फॅशन स्टेटमेंटमुळे चर्चेत असते. मानसीने आतापर्यंत ‘हॅलो बोल’, ‘मराठी तारका’ यांसारख्या अनेक मराठी रिअॅलिटी डान्सिंग शोच्या माध्यमातून आपले नृत्यकौशल्य दाखवले आहे. याव्यतिरिक्त रुपेरी पडद्यावरही मानसीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. मानसीचे ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर या’ हे गाणे प्रचंड प्रसिद्ध झाले होते.

No comments

Powered by Blogger.