मुंबईत दोन गटांमध्ये तुफान दगडफेक आणि हाणामारी
चेंबुर परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा दोन गटांत तुफान वाद झाला आणि
त्याचं रुपांतर हाणामारीत झालं. यावेळी दोन गटांतील नागरिकांनी एकमेकांवर
दगडफेकही केली त्यामध्ये अनेक गाड्यांचंही नुकसान झालं आहे. मुकुंदनगर
कॉलनीतील मैदानात हा संपूर्ण प्रकार घडल्याची माहिती मिळत आहे. दोन
गटांमध्ये झालेल्या हाणामारीत 6 जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी
स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

मुकुंदनगर कॉलनीमध्ये
जुन्या इमारतीमधील रहिवासी मैदानात आपल्या गाड्या पार्क करतात. तिथे नव्या
इमारतीमधील सगळी मुलं मिळून क्रिकेट खेळत होते. क्रिकेट खेळताना मुलांकडून
गाडीच्या काचा फुटल्या आणि त्यावरून वादाला तोंड फुटले. हा वाद एवढा वाढला
की दोन गटांमध्ये तुफान हाणामारी आणि दगडफेक झाली. यावेळी तिथल्या
गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली. टॅक्सी आणि बसच्या काचा फोडण्यात आल्या
आहेत.
Post a Comment