अखेर पंतला भारतीय संघात दिली संधी

अखेर पंतला भारतीय संघात दिली संधी

भारतीय संघात गेल्या अनेक सामन्यांपासून ऋषभ पंतला संधी दिली जात नाही यावरून अनेकांनी कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि संघ व्यवस्थापनाला ऐकवले होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मुंबईत झालेल्या वनडे सामन्यात पंतच्या हेल्मेटला चेंडू लागला होता. त्यानंतर तो त्याला विश्रांती दिली गेली. त्याच्या ऐवजी केएल राहुलने विकेटकीपर म्हणून जबाबदारी पार पाडली. राहुलने फलंदाजी आणि विकेटच्या मागे शानदार कामगिरी केल्यामुळे न्यूझीलंड दौऱ्यातील टी-२० आणि वनडे संघात पंतचा विचार झाला नाही. यावरून अनेकांनी टीका केली होती. पण अखेर पंतला भारतीय संघात स्थान देण्यात आले.
न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेआधी भारतीय संघाचा न्यूझीलंड अ संघाविरुद्धच्या सराव सामन्याला आज सुरूवात झाली. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताची सलामीची जोडी पृथ्वी शॉ आणि मयांक अग्रवाल हे दोघे अनुक्रमे शून्य आणि १ धाव करून बाद झाले. त्यानंतर शुभमन गिल देखील शून्यावर बाद झाला. भारताची अवस्था ३ बाद ५ अशी झाली. अजिंक्य रहाणे देखील १८ धावा करून माघारी परतला.

भारतीय संघाची अवस्था ४ बाद ३४ अशी असताना चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारी हे भारताच्या मदतीला धावून आले. त्यांनी पाचव्या विकेटसाठी १९५ धावांची भागिदारी केली. पुजारा ९३ धावांवर बाद झाला. तर विहारीला शतकी खेळी केल्यानंतर दुखापतीमुळे मैदानाबाहेर जावे लागले. पुजार-विहारी जोडी माघारी परतल्यानंतर भारताचा डाव कोसळला आणि २६३ धावांवर ऑल आऊट झाला. 

No comments

Powered by Blogger.