भरधाव वेगात पळणारी मोटार चहाच्या दुकानात शिरली, पाच जखमी

पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डी परिसरात भरधाव वेगात असलेली मोटार (व्हॅन) चहाच्या दुकानात शिरली. ही घटना आज सकाळी पावणे नऊच्या सुमारास घडली आहे. या घटनेत एकूण पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, भरधाव वेगातील व्हॅन चालक हा दुचाकीला वाचवताना त्याचे नियंत्रण सुटले आणि व्हॅन थेट चहाच्या दुकानात शिरली.
चहा प्यायला थांबलेल्या व्यक्तींच्या लक्षात येताच त्यांनी पळ काढला. दैव बलवत्तर असल्याने जीवितहानी नाही, परंतु, घटनेत काही जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून वाहन चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

No comments

Powered by Blogger.