RBI जवळ असलेल्या साठ्यापेक्षा जास्त सोनं उत्तर प्रदेशात

उत्तर प्रदेशातील सोनभद्रमध्ये तब्बल 3 हजार टन सोन्याचं घबाड सापडलं आहे. नक्षलग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोनापहाडी आणि हरदी या दोन जिल्ह्यात सोन्याच्या खानी सापडल्या आहेत. या खानीतील सोन्याचा लवकरच लिलाव होणार असून यासाठी सात सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या सोन्याची किंमत १२ लाख कोटींच्या आसपास असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, १९९२-९३ पासून भूगर्भशास्त्र सर्वेक्षण विभागने सोनभद्रमध्ये सोन्याचा खाणींचा शोध सुरु केला होता. ‘जीएसआय’च्या अंदाजानुसार सोनापहाडीमध्ये २९४३ टन आणि हरदीमध्ये ६५० किलो सोने मिळालं आहे. उत्खननामध्ये हे साठे प्रत्यक्ष उपलब्ध झाल्यास जगभरातील सर्वाधिक सोनं असलेल्या देशांच्या यादीत भारत दुसऱ्या स्थानी झेप घेईल. या सोन्याचा लिलाव लवकरच होणार असून यासाठी ई-निविदा मागवण्यात येणार आहेत.
या परिसरातील पोटॅशियम, युरेनियम, लोहखनिज आणि सिलिमेनाईटचेही साठे असण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथे उत्खनन सुरू आहे

No comments

Powered by Blogger.