पीडितेच्या मृत्यूनंतर रोहित पवारांनी केलं ट्विट
हिंगणघाटमध्ये एका प्राध्यापक तरुणीला जिवंत जाळण्याची घटना घडली. या
घटनेनं महाराष्ट्र हादरला. तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या
सात दिवसांपासून पीडिता मृत्यूशी झगडत होती. डॉक्टरांचं पथक अहोरात्र धडपड
होतं. पण, सोमवारची सकाळ उजाडली अन् पीडितेची प्राणज्योत कायमची
मालवली. हिंगणघाटमधील पीडितेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर सगळीकडं
हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे. शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार
यांनीही ट्विट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त करत नागरिकांना आवाहन केलं.
"धक्कादायक, संतापजन घटनेची अखेर अत्यंत वेदनादायी झाली. वर्धा जळीतकांडातील
पिडितेचा दुर्दैवी मृत्यू हा विकृतीचा बळी ठरला आहे.पिडितेच्या आत्म्यास
शांती लाभावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो पण समाजातील विकृतीची राख
करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू हीच पिडितेला खरी श्रद्धांजली ठरेल."असं आवाहन रोहित पवार यांनी केलं आहे.
Post a Comment