शिल्पा शेट्टी दुसऱ्यांदा झाली आई
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आई झाली आहे. तिने एका मुलीला जन्म
दिला आहे. शिल्पाने आपल्या मुलीचं नाव समिषा असं ठेवलं आहे. खरं तर १५
फेब्रुवारीलाच शिल्पाने मुलीला जन्म दिला होता. परंतु तिने सहा दिवसांनंतर
ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.
शिल्पाने इन्स्टाग्रानवर एक फोटो पोस्ट करुन ही आनंदाची बातमी दिली. या
फोटोमध्ये शिल्पाची मुलगी तिचे बोट पकडताना दिसत आहे. “ओम श्री गणेशाय नमः।
आमच्या प्रार्थनेचे उत्तर आम्हाला एका चमत्काराच्या रुपाने मिळाले आहे.”
अशा आशयाची कॉमेंट या फोटोवर शिल्पाने केली आहे.
हा फोटो सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत हजारो
नेटकऱ्यांनी शिल्पावर अक्षरश: कौतुकाचा वर्षाव केला आहे. खरं तर शिल्पा
दुसऱ्यांदा आई झाली आहे. २०१२ साली तिने आपल्या पहिल्या मुलाला जन्म दिला
होता. तिच्या पहिल्या मुलाचं नाव विहान असं आहे.
Post a Comment