डोनाल्ड ट्रम्प यांनी केली ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ची स्तुती

अभिनेता आयुषमान खुराना बॉलिवूडमधील अत्यंत प्रयोगशील अभिनेता म्हणून ओळखला जातो. तो आपल्या प्रत्येक नव्या चित्रपटात आव्हानात्मक भूमिका साकारण्याचा प्रयत्न करतो. सध्या त्याचा ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा चित्रपट जोरदार चर्चेत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात पुरुषांची समलिंगी लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे. या अनोख्या लव्हस्टोरीचे कौतुक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील केले आहे.
अमेरिकी मानवाधिकार संरक्षक कार्यकर्ता पीटर टचल यांनी ‘शुभ मंगल ज्यादा सावधान’ या चित्रपटाच्या संकल्पनेची स्तुती केली. “भारतात समलैंगिकतेला कायदेशीर मान्यता मिळाली. आता देशातील वैचारिकदृष्ट्या मागस लोकांचं प्रबोधन करण्यासाठी बॉलिवूडचा एक नवा चित्रपट सज्ज झाला आहे. या चित्रपटात समलिंगी लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.” अशा आशयाचं ट्विट पीटर टचल यांनी केलं होतं. हे ट्विट डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘ग्रेट’ असं म्हणत रिट्विट केलं आहे.

No comments

Powered by Blogger.