कल्याण डोंबिवलीकरांची पूल कोंडी नंतर आता स्कायवॉक कोंडी होणार
दहा वर्षांपूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये एमएमआरडीए
आणि केडीएमसीने ६३ कोटी रुपये खर्चून तयार केलेलला स्कायवॉकचा काही भाग
धोकादायक झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई आयआयटीने
केडीएमसीला याबद्दल अहवाल दिला आहे.कल्याण डोंबिवली महापालिका
क्षेत्रांत एमएमआरडीए आणि केडीएमसीने कोट्यावधी रुपये खर्चून स्कायवॉकची
निर्मिती केली आहे. मात्र, दहा वर्षातच या स्कायवॉकचे जिने आणि पुला खालचा
भाग धोकादायक झाल्याचा धक्कादायक अहवाल मुंबई आयआयटीने केडीएमसी प्रशासनाला
दिला आहे.
त्यामुळे केडीएमसी प्रशासनाने दुरुस्तीचे काम केडीएमसीकडून लवकरच हाती
घेण्यात असल्याची माहिती सिटी इंजिनियर सपना कोळी यांनी न्यूज १८ लोकमतला
दिली आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवलीकरांची पूल कोंडी नंतर आता स्कायवॉक
कोंडी होणार आहे.
दरम्यान,
वाहतूक कोंडी सोडण्यासाठी तसंच रस्त्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी केडीएमसी
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या भंगार आणि
बेवारस दुचाकी चारचाकी गाड्यांवर कारवाईचे आदेश दिल्यानंतर ट्राफिक
पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे.
कल्याण डोंबिवली शहरात रस्त्याच्याकडे उभ्या असलेल्या
बेवारस आणि भंगार गाड्यांमुळे नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते
एवढंच नाही तर या वाहनांमुळे अपघाताची शक्यता पण जास्त असते. रस्त्याच्या
सौंदर्यावर याचा परिणाम होत आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडण्यासाठी तसंच
रस्त्यांचे सौंदर्य वाढविण्यासाठी केडीएमसीचे नवे आयुक्त डॉ. विजय
सुर्यवंशी यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या भंगार आणि बेवारस दुचाकी चारचाकी
गाड्यांवर कारवाईचे आदेश दिले.
आयुक्ताच्या आदेशानंतर केडीएमसी आणि
वाहतूक पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने धडक कारवाई सुरू केली आहे. २
डम्पर आणि दोन क्रेनच्या साय्याने रत्याच्या बाजूला उभ्या असलेल्या भंगार
आणि बेवारीस गाड्याना स्टीकर लाऊन 4 तासाचा अवधी देऊन 4 तासानंतर या
उचलण्याचे काम सुरू केले आहे.
Post a Comment