माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाचा धक्का
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयाचा धक्का |
निवडणूक प्रतिज्ञापत्रात गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने माजी मुख्यमंत्री फडणवीसांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. यामुळे फडणवीस अडचणीत येण्याची शक्यता आहे.
काय आहे प्रकरण
निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्यावरील गुन्ह्यांची माहिती लपविल्याचा भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप आहे. यापूर्वी नागपूर न्यायालयाने फडणवीसांना 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता. नागपुरातील 2 गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा फडणवीसांवर आरोप आहे. यातील एक मानहानीचा खटला आणि दुसरा फसवणुकीचा खटला आहे. यापूर्वी सत्र न्यायालयाने याबाबत फडणवीसांना समन्स बजावला होता.
Post a Comment