coronavirusUpdates | कोरोना व्हायरसमुळे जर्मनीच्या अर्थमंत्र्याची आत्महत्या
![]() |
coronavirusUpdates | कोरोना व्हायरसमुळे जर्मनीच्या अर्थमंत्र्याची आत्महत्या |
कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगाला सुन्न
करणारं वृत्त आहे. जर्मनीच्या हेसे राज्याचे अर्थमंत्री थॉमस शेफर यांनी
आत्महत्या केली आहे. अर्थमंत्री शेफर यांचा मृतदेह फ्रॅन्कफर्टजवळच्या
होकाईम इथे रेल्वे ट्रॅकवर सापडला. कोरोना व्हायरसमुळे जी आर्थिक परिस्थिती
उद्भवली आहे, अशात देशाच्या अर्थव्यवस्थेचं काय होणार, या विचाराने थॉमस
शेफर तणावाखाली होते. या तणावातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचं म्हटलं जात
आहे. जर्मनीमध्येही कोरोनाने हाहाकार माजवला आहे. देशात आतापर्यंत 540
पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
54 वर्षीय थॉमस शेफर हे जर्मनीच्या
चॅन्सलर अँजेला मर्केल यांच्या ख्रिस्तिन डेमोक्रॅटिक युनियनचे सदस्य होते.
गेल्या दहा वर्षांपासून ते हेसे राज्याचे अर्थमंत्री होते. कोरोना
व्हायरसमुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या परिणामाविरोधात लढण्यासाठी दिवस-रात्र
काम करीत होते. शिवाय विविध कंपनी व कामगारांना मदतही करीत होते.
कोरोनामुळे पुढे काय होणार यामुळे ते चिंतेत होते. कोरोनामुळे
अर्थव्यवस्थेचे नुकसान होत आहे, हे पाहून त्यांना खूप त्रास होत होता.
त्यामधूनच थॉमस शेफर यांनी आत्महत्या केल्याचं कळतं.
जगभरात कोरोनाबाधितांची संख्या साधारण
सव्वा सात लाख आहे. तर मृतांची संख्या 34 हजारांच्या घरात आहे. यापैकी एक
लाख 51 हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर अजून जवळपास पाच लाख 37 हजार लोग
कोरोनाग्रस्त आहे. त्यातील पाच टक्के म्हणजे साधारण 27 हजार गंभीर आहेत.
Post a Comment