संकटाच्या काळात डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करून असंवेदनशीलता दाखवू नये - आरोग्यमंत्री राजेश टोपे

संकटाच्या काळात डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करून असंवेदनशीलता दाखवू नये -  आरोग्यमंत्री राजेश टोपे
राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडा १३५ वर पोहोचल आहे. तर दुसरीकडे ज्यांना करोनाची लागण झाली होती त्यांचा आजार बराही झाला आहे. करोना बरा होतो हे लक्षात घेण्याची गरज आहे, असं मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. गुरूवारी झालेल्या बैठकीत आम्ही महत्त्वाच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. संकटाच्या काळात डॉक्टरांनी रूग्णालंय, क्लिनिक बंद करून असंवेदनशीलता दाखवू नये, अस आवाहनही त्यांनी राज्यातील खासगी डॉक्टरांना केलं आहे.
अनेक ठिकाणी अनेक रुग्णालयं भीतीपोटी बंद केलेत. हे अयोग्य आहे. अशा परिस्थितीत डॉक्टर हे देवासमान असतात. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी, आपण अशा परिस्थितीत असंवेदनशीलता दाखवली तर सामान्य जनतेनं कोणाकडे जावं? असा सवाल टोपे यांनी केला. आम्ही सर्वांना सुचित केलं आहे रूग्णालये सुरू राहतील. कोणालाही त्रास होणार नाही. डॉक्टरांनी आपली रूग्णालये सुरू ठेवावी. करोना बाजूला ठेवावा. त्याव्यतिरिक्त आणखीही आजार आहेत. काही आपात्कालिन परिस्थितीत जर कोणाला काही मदत हवी असेल तर त्यांनी जावं कोणाकडे. त्यांनी आपली क्लिनिकही सुरू ठेवावी, असं टोपे म्हणाले.

सध्या आपल्याकडे सात ते आठ दिवसाचा रक्तसाठा आहे. रक्तपेढीच्या प्रमुखांनी आम्हाला ही माहिती दिली. रक्ताची जागा आणखी कोणाला घेता येत नाही. ती फार काळ साठवण्याचीही गोष्ट नाही. रक्त हे केवळ करोनासाठीच लागतं असं नाही. अनेक उपचारांसाठी रक्ताची आवश्यकता भासते. रक्तदानासाठी डोनेशनसाठी आपण कॅम्प आयोजित केले पाहिजेत. परंतु आदेशाचा भंगही झाला नाही पाहिजे, असंही आम्ही ठरवलं आहे, असं टोपे म्हणाले. सध्या पीपीई एन ९५ च्या उत्पादनसाठी प्रयत्न सुरू आहेत. रोगप्रतिकारशक्ती आणि योग्य उपचारानं करोना हा आजार बरा होऊ शकतो, असंही त्यांनी नमूद केलं.



संबंधित बातम्या पाहा 

No comments

Powered by Blogger.