JantacurfewMarch22 | “तुमचं राजकारण होम क्वारंटाईन करा” - रोहित पवार
![]() |
JantacurfewMarch22 | “तुमचं राजकारण होम क्वारंटाईन करा” - रोहित पवार |
सध्या महाराष्ट्रासमोर करोनाचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान आहे. यासाठी
राज्य सरकारने काही महत्त्वाचे निर्णय घेतले असून सर्वतोपरी प्रयत्न सुरु
आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र येऊन काम
करण्याचं आवाहनदेखील केलं आहे. मात्र भाजपा नेते निरंजन डावखरे यांनी उद्धव
ठाकरेंच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करताना महाराष्ट्राला सध्या देवेंद्र
फडणवीसांची गरज आहे असं म्हटलं आहे. त्यांच्या या टीकेचा राष्ट्रवादीचे
आमदार रोहित पवार यांनी समाचार घेत खडे बोल सुनावले आहेत. संकटाच्या काळात
तरी तुमचं राजकारण ‘होम क्वारंटाईन’ करा असा सल्ला चरोहित पवारांनी दिला
आहे.
निरंजन डावखरे यांनी काय म्हटलं ?
निरंजन डावखरे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. सध्या राज्यात करोनाने थैमान घातलं असताना निरंजन डावखरे यांनी महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर देवेंद्र फडणवीसांची गरज आहे असं म्हटलं होतं. ट्विट करत त्यांनी लिहिलं होतं की, “सध्या महाराष्ट्राला शून्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजेच देवेंद्र फडणवीसांची गरज आहे”.

रोहित पवारांचं उत्तर –
निरंजन डावखरे यांच्या टीकेचा रोहित पवारांनी समाचार घेत खडे बोल सुनावले आहेत. त्यांनी म्हटलं की, “राजकारण आम्हालाही करता येतं, पण आज ती वेळ नाहीय. संकटाच्या काळात तरी तुमचं राजकारण ‘होम क्वारंटाईन’ करा. तुमचा एवढा ‘अभ्यास’ व अनुभव असेल तर मदत करायला तुम्हाला अडवलं कुणी?’

रम्यान राज्यात आणखी तीन नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून असून रुग्णांचा आकडा
५२ वर पोहोचला आहे. पुणे, मुंबई आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येकी एकाला
करोनाचा संसर्ग झाला असल्याचं निष्पन्न झालं असल्याची माहिती आरोग्यमंत्री
राजेश टोपे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संबंधित बातम्या पाहा
संबंधित बातम्या पाहा
Post a Comment