अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेची मोठी व्याजदर कपात
![]() |
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रिझर्व्ह बँकेची मोठी व्याजदर कपात |
करोना व्हायरच्या पार्श्वभूमीवर रेपो दरात कपात करण्याचा निर्णय
रिझर्व्ह बँकेने घेतला आहे. रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात केल्याची घोषणा
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी केली. तसंच नागरिकांनी संयम
बाळगावा, असंही त्यांनी नमूद केलं. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे सर्व
प्रकारची कर्ज स्वस्त होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीर रिझर्व्ह
बँकेकडून मोठा निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.
त्यानुसार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी पत्रकार परिषदेत
मोठी घोषणा केली.
शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात करण्याचा
निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर ५.१५ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांवर आला आहे.
तर रिव्हर्स रेपो दरात ०.९० टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे रिव्हर्स
रेपो दर ४.९० टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला आहे. याव्यतिरिक्त
अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणाही शक्तिकाता दास
यांनी केली. याव्यतिरिक्त रिवर्स रेपो दरातही ०.९० टक्क्यांची कपात
करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या
निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे.
करोनामुळे जगभरात मंदी येण्याची शक्यता आहे. करोनाचा भारतीय
अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाल्याचे ते म्हणाले. याव्यतिरिक्त रिझर्व्ह
बँकेनं सीआरआर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांचा सीआरआर कमी करून तो ३
टक्क्यांवर आणण्यात आला आहे. यामुळे बाजारात ३ लाख ७४ हजार कोटी रूपये
खेळते होतील, असही दास म्हणाले.
तीन महिने ईएमआय स्थगित करा
कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्लाही बँकांना शक्तिकांता दास यांनी दिला आहे. असं झाल्यास सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्लाही बँकांना शक्तिकांता दास यांनी दिला आहे. असं झाल्यास सामान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
सध्या दिलासा देण्याची आवश्यकता होती – मुनगंटीवार
आपण निर्णय हे मानवतेच्या दृष्टीकोनातून घेतले पाहिजेत. पुढे जाऊन
पुन्हा आपण कष्ट करून अर्थव्यवस्था रूळावर आणू. सामान्यांना, मध्यम वर्गीय
कुटुंबीयांना सध्या दिला देण्याची आवश्यक होती आणि रिझर्व्ह बँकेनं तो
निर्णय घेतला याबाबत त्यांचं अभिनंदन, असं मत माजी अर्थमंत्री सुधीर
मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं.
Post a Comment