तीन महिने ईएमआय स्थगित करा रिझर्व्ह बँकेचा बँकांना सल्ला
![]() |
तीन महिने ईएमआय स्थगित करा रिझर्व्ह बँकेचा बँकांना सल्ला |
देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा
परिस्थितीत रिझर्व्ह बँकेनं आज रेपो दर आणि रिव्हर्स रेपो दरात मोठी कपात
करण्याची घोषणा केली. त्यामुळे समान्यांच्या कर्जाचे हप्ते कमी होणार असून
त्यांना दिलासा मिळणार आहे. याव्यतिरिक्त कर्जाच्या हप्त्यांची वसूली तीन
महिन्यांसाठी स्थगित करण्याचा सल्ला रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांता
दास यांनी बँकांना दिला आहे. त्यामुळे आता बँका काय निर्णय घेणार याकडे
सर्वांचं लक्ष लागलं आहे.
शुक्रवारी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात करण्याचा
निर्णय घेतला. त्यामुळे रेपो दर ५.१५ टक्क्यांवरून ४.४ टक्क्यांवर आला आहे.
तर रिव्हर्स रेपो दरात ०.९० टक्क्यांची कपात केली आहे. यामुळे रिव्हर्स
रेपो दर ४.९० टक्क्यांवरून ४ टक्क्यांवर आला आहे. याव्यतिरिक्त
अल्पकालावधीच्या कर्जाच्या व्याजदरात कपात करण्याची घोषणाही शक्तिकाता दास
यांनी केली. याव्यतिरिक्त रिवर्स रेपो दरातही ०.९० टक्क्यांची कपात
करण्याचा निर्णय रिझर्व्ह बँकेनं घेतला आहे. रिझर्व्ह बँकेच्या या
निर्णयामुळे सर्व प्रकारच्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार आहे.
करोनामुळे जगभरात मंदी येण्याची शक्यता आहे. करोनाचा भारतीय
अर्थव्यवस्थेवरही मोठा परिणाम झाल्याचे ते म्हणाले. याव्यतिरिक्त रिझर्व्ह
बँकेनं सीआरआर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकांचा सीआरआर कमी करून तो ३
टक्क्यांवर आणण्यात आला आहे. यामुळे बाजारात ३ लाख ७४ हजार कोटी रूपये
खेळते होतील, असही दास म्हणाले.
Post a Comment