रेडीरेकनरचे दर मार्चअखेरीस जाहीर होणार नाहीत महसूलमंत्रि बाळासाहेब थोरात यांची माहिती

रेडीरेकनरचे दर मार्चअखेरीस जाहीर होणार नाहीत महसूलमंत्रि बाळासाहेब थोरात यांची माहिती 
राज्य सरकारकडून दर वर्षी मार्चअखेरीस रेडीरेकनरचे दर जाहीर केले जातात. मात्र गेल्या पंधरा दिवसापासून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला सावरण्यासाठी झटत आहेत. त्यामुळे यावर्षीचे रेडीरेकनर दर 31 मार्चला जाहीर होणार नसून कोरोनाच्या संकटातून महाराष्ट्र मुक्त झाल्यानंतर हे दर जाहीर केले जातील, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. दरवर्षी मार्चअखेरीस रेडीरेकनर दर जाहीर होतात, मात्र महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी कोरोनाच्या संकटातून जनतेला वाचवण्यासाठी कार्यरत आहेत. कोरोनाचे संकट दूर झाल्यावर दर जाहीर करण्यात येतील, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.
थोरात यांनी सांगितले की, जीवनावश्यक वस्तू वेळेत आणि पुरेशा प्रमाणात जनतेपर्यंत पोहोचतील यासाठी सरकार युद्धपातळीवर काम करत आहे. धान्याच्या ऐवजी थेट पीठ नागरिकांना कसे मिळेल याबाबतीतही ही सूक्ष्म नियोजन सुरू आहे. शेतीची कामे करण्यासाठी लॉकडाऊन मध्ये निर्बंध नाही. गव्हाची कापणी करण्यासाठी पंजाबहून जे हार्वेस्टिंग मशीन येथे आलेले आहेत, त्यांनाही पुरेशा इंधनाची उपलब्धता करून दिली जाईल, तशा सूचना आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत. पेट्रोल पंपांवर हार्वेस्टिंग मशिनरीला इंधन दिले जाईल.

संपूर्ण लॉकडाउनला जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवू नये अशा आशयाच्या सूचना राज्य शासनमार्फत प्रत्येक ठिकाणच्या जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांची ओळख व्हावी यासाठी पासेसची उपलब्धता करून वाहतूक सुरळीत केली जात असल्याचे थोरात यांनी सांगितले.संबंधित बातम्या पाहा 

No comments

Powered by Blogger.