शरद पवारांवर पीएचडी करण्याचं काम चालू असताना आता अजितदादांवर पीएचडी करण्याची इच्छा – bjp चंद्रकांत पाटील
![]() |
शरद पवारांवर पीएचडी करण्याचं काम चालू असताना आता अजितदादांवर पीएचडी करण्याची इच्छा |
अजित पवारांचं व्यक्तिमत्व कमाल असून आपल्याला त्यांच्यावर पीएचडी
करण्याची इच्छा असल्याचं भाजपाचे(BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी
म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस, शरद पवार यांच्याप्रमाणे उद्धव ठाकरेंकडे
अजेंडा आणि व्हिजन नाही अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. लोकसत्ता ऑनलाइनला
दिलेल्या मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांवर दिलखुलास उत्तरं दिली.
यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “शरद पवारांवर पीएचडी करण्याचं काम
चालू असताना आता अजितदादांवर पीएचडी करावीशी वाटू लागली आहे. कारण तुमचं
सरकार असतानाही उपमुख्यमंत्री, त्यांचं सरकार असतानाही उपमुख्यमंत्री…सिंचन
घोटाळा केला तरी काही नाही, शेतकऱ्यांना वाईट बोललं तरी काही नाही. कधी
चिडून राजीनामा देतात. पण इतकं सगळं केल्यानंतरही ते मध्यवर्ती आहेत”.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका
केली. उद्धव ठाकरे यांचा काही अभ्यास नसून रजिस्ट्रर सावकारी आणि सावकारी
यामधील फरक त्यांनी सांगावा असं थेट आव्हानच दिलं आहे. “मुख्यमंत्र्यांचा
काही अभ्यास, अजेंडा नाही. मला मुख्यमंत्र्यांनी रजिस्ट्रर सावकारी आणि
सावकारी यामधील फरक सांगावा. हे जेव्हा तुम्हाला माहिती नसतं तेव्हा
डोक्यात सावकारी संपवायची आहे याबद्दल अजेंडाच निर्माण होऊ शकत नाही,” असं
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटलं.
Post a Comment