सहलीला गेलेल्या कुटुंबाची बोट तापी नदीत उलटली

महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील उच्छल येथील तापी नदीच्या बॅकवॉटरमध्ये बोट उलटून 15 जण बुडाले. त्यात स्थानिक ग्रामस्थ व मासेमारी करणाऱ्या लोकांनी 6 जणांचे प्राण वाचवले. एका बालिकेचा घटनास्थळी बूडून मृत्यू झाला. तर 8 जण बेपत्ता झाल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली आहे. मंगळवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ऐन सणासुदीच्या दिवशी ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र गुजरात सीमावर्ती भागातील उच्छल येथील तापी नदीच्या उकाई धरणातील बॅकवॉटर जवळील भींतखुद गावाजवळून 15 जण एका बोटीने प्रवास करत होते. दुपारी चार वाजण्याच्या सुमारास ही बोट अचानक बुडाली. ही घटना समजताच स्थानिक ग्रामस्थ आणि मासेमारी करणाऱ्यांनी बचावकार्य राबवत सहा जणांचे प्राण वाचवले. मात्र, आठजण अजूनही बेपत्ता आहेत. दरम्यान, एका बालिकेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. बचावकार्य सुरू असून अंधार पडल्याने बचाव कार्याला अडचणी येत आहे. पोलीस प्रशासन महसूल विभागाचे अधिकारी, सुरत येथील अग्नीशमन दलाची टिम घटनास्थळी रवाना झाली आहे. मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे.
होळीची सुट्टी असल्याने गुजरातच्या उच्छल तालुक्यातील सुंदरपूर येथील परिवार सहलीसाठी उकाई धरणात बोटींग करण्यासाठी गेले. भिंतखुद गावाजवळ वेगाने वारा आल्याने बोट अनियंत्रित झाल्याने अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यावेळी मोठ्या प्रमाणात वाचवा-वाचवा असा आरडाओरड आल्याने गावाजवळील ग्रामस्थांनी पाण्यात उड्या मारून सहा जणांना वाचवले. सुंदरपूर नवापूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे. सुंदरपुर गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत नवापूर तालुक्यातील दोन जणांचा समोवश आहे.
 

No comments

Powered by Blogger.