पुण्यातील कोरोनाग्रस्तांसह प्रवास करणाऱ्या बीडमधील सहप्रवाशांवर आरोग्य विभागाची करडी नजर
दुबईहून आलेल्या पुण्यातील पती-पत्नीला कोरोना व्हायरसची लागल झाल्याचे
स्पष्ट झालं आहे. त्यानंतर त्यांच्या निकटवर्तीयांचाही शोध घेणे सुरू केलं
आहे. या दाम्पत्याची मुलगी तसेच ज्या टॅक्सीने या रुग्णांनी मुंबई-पुणे
प्रवास केला, तो टॅक्सी ड्रायव्हर आणि त्यांचा विमानातील सहप्रवासी हे
तिघेही कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे पुण्यातील कोरोना पॉझिटिव्ह
रुग्णांची संख्या आता पाच झाली आहे. अशातच पुण्यातील कोरोनाच्या
रूग्णांसोबत प्रवास करणाऱ्या बीडच्या तिघांवरही आरोग्य विभागाची करडी नजर
आहे. तिनही प्रवाशांची तब्येत ठणठणीत आहे. तरिही खबरदारीचा उपाय म्हणून
पुढील 28 दिवस आरोग्य विभागाकडून या दोघांची आरोग्य तपासणी केली जाणार
आहे. गेल्या 10 दिवसापासून त्यांच्यावर आरोग्य विभाग बीडमधील तीन जणांवर
लक्ष ठेऊन आहे. कोरोनाचं कोणतंही लक्षण दिसताच त्यांना उपचारासाठी दाखल
करून घेतले जाणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी
सांगितले आहे.
दुबईमध्ये फिरण्यासाठी 40 जणांचा ग्रुप गेला होता. दुबईहूनन परतणाऱ्या
दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. या दोघांसोबत तर 40
प्रवासी दुबईहून विमानात आले होते त्यांच्यावर आता आरोग्य विभागाने करडी
नजर ठेवली आहे. कोरोनाची लागण झालेल्यां प्रवाशांसोबतच बीडचे हे तीन
प्रवासी दुबईहून एकाच विमानामध्ये आले होते. त्यामुळे त्यांचीही आरोग्य
विभागाने तपासणी केली आहे. मात्र त्यांची तब्येत ठणठणीत असून आरोग्य
विभागाकडून दररोज त्यांची तपासणी केली जात आहे. कोरोनाचं कोणतंही लक्षण
दिसून आल्यास त्यांना लगेच उपचारासाठी दाखल करण्यात येणार आहे. परंतु,
सध्या घाबरण्याचं काहीही कारण नसल्याचं आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.
Post a Comment