Coronavirus | इटलीमध्ये 24 तासांत 368 जणांचा मृत्यू

Coronavirus
Coronavirus | इटलीमध्ये 24 तासांत 368 जणांचा मृत्यू
Coronavirus कोरोना व्हायरसमुळे चीननंतर इटलीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. इटलीमध्ये कोरोनामुळे मागील 24 तासांमध्ये 368 जणांचा मृत्यूल झाला आहे. तसेच चीनमध्ये मागील 24 तासांमध्ये फक्त 14 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये जरी कोरोनाचा कहर कमी होत असेल तरी इटलीमध्ये मात्र कोरोनामुळे परिस्थिती आणखी गंभीर होत आहे. जगभरात आतापर्यंत 6515 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 157 देशांमध्ये 1 लाख 69 हजार 500 एवढी कोरोनाबाधितांची संख्या आहे.

इटलीमध्ये 1809 लोकांचा मृत्यू, चीनमध्ये कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट

चीननंतर कोरोना व्हायरसचा सर्वाधिक परिणाम इटलीमध्ये पाहायला मिळत आहे. येथे आतापर्यंत कोरोनामुळे 1809 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे 3509 नवीन रूग्ण समोर आले आहेत. आतापर्यंत इटलीमध्ये एकूण 24, 747 लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 2335 लोक या व्हायरसमुळे बरेही झाले आहेत. इटलीमध्ये गेल्या 14 तासांत जवळपास 368 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, इटलीमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पार्कमध्ये जाण्यासही बंदी घालण्यात आली आहे. तसेच इतरही निर्बंध लावण्यात आले आहेत.

दरम्यान, चीनमध्ये कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा हा सर्वाधिक आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोना व्हायरसमुळे 3214 लोकांचा मृत्यू झाला आहे. परंतु, कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाल्याचं दिसून येत आहे. मागील 24 तासांमध्ये येथए फक्त 14 कोरोना बाधित आढळून आले आहेत. तर आधीपासून संक्रमित लोकांमधील 14 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये आतापर्यंत 67 हजारांपेक्षा अधिक लोक कोरोनामधून बरे झाले आहेत.

No comments

Powered by Blogger.