Coronavirus | WHO चे डायरेक्टर जनरल डॉक्टर यांचे दीपिका आणि प्रियांका ला 'सेफ हँड्स चॅलेंज'

Coronavirus, WHO
Coronavirus | WHO चे डायरेक्टर जनरल डॉक्टर यांचे दीपिका आणि प्रियांका ला  'सेफ हँड्स चॅलेंज'
Coronavirus | WHO : कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे देश आणि विदेशात शाळा, महाविद्यालयं आणि कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सोशल मीडियावरूनही कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. तसेच या व्हायरसपासून बचाव करण्यासाठी अनेक लोक सोशल मीडियावर जनजागृती करताना दिसत आहेत. गर्दीत जाणं टाळा, आपले हात सतत स्वच्छ करा यांसारख्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO)ने देखील सोशल मीडियावरून अनेक सेलिब्रिटींना याबाबत जनजागृती करण्याचं आवाहन केलं आहे
WHO चे डायरेक्टर जनरल डॉक्टर टेड्रोस एधानोम यांनी ट्विटरवरून अनेक सेलिब्रिटींना टॅग केलं आहे. त्यांनी सेलिब्रिटींना 'सेफ हँड्स चॅलेंज' स्विकारण्याची विनंती केवी आहे. टेड्रोस यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, ग्लोबल स्टार्सनी सेफ हँड्स चॅलेंज स्विकारून आपला व्हिडीओ शेअर करावा. तसेच आपल्या सोबत आणखी तीन व्यक्तींना हे चॅलेंज द्यावं. आपण सर्व एकत्र येऊन या व्हायरसशी दोन हात करू शकतो.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतातील अनेक राज्यांमध्ये मॉल्स, चित्रपटगृह, जिम आणि स्विमिंग पूल्स बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट भूल भुलैया 2चं शुटिंगही थांबवण्यात आलं आहे. एवढचं नाहीतर 24 मार्च रोजी रिलीज करण्यात येणारी अक्षय कुमार आणि कटरीना कैफ स्टारर फिल्म सूर्यवंशीची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली आहे.

No comments

Powered by Blogger.