CoronaVirusUpdate | लोकल, बस सेवा बंद करणार? मुख्यमंत्रि घेणार मोठा निर्णय
![]() |
CoronaVirusUpdate | लोकल, बस सेवा बंद करणार? मुख्यमंत्रि घेणार मोठा निर्णय |
राज्यासमोर करोनाचं संकट उभं ठाकलं आहे. राज्य सरकार या संकटाला तोंड
देण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढत आहे.
शुक्रवारी यात भर पडली असून, करोना बाधितांचा आकडा ५२ वर पोहोचला आहे.
यासंदर्भात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन ही
माहिती दिली. दिलासादायक बाब म्हणजे करोनाचा संसर्ग झालेले पाच रुग्ण बरे
झालेले असून त्यांना लवकरच सुटी दिली जाणार असल्याचं टोपे यांनी सांगितलं.
यावेळी टोपे यांनी मुंबईतील लोकल सेवा बंद करण्याबद्दलही भाष्य केलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी राज्यातील जनतेला सहकार्य करण्याचं
आवाहन केलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आज पुन्हा संवाद साधणार
असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
Post a Comment