CoronaVirusUpdates | पिंपरी चिंचवडमध्ये २४ वर्षीय तरुणाला करोना

CoronaVirusUpdates | पिंपरी चिंचवडमध्ये २४ वर्षीय तरुणाला करोना
राज्यातील जनतेसाठी एक दिलासा देणारी, तर दुसरी चिंता वाढवणारी बातमी आहे. करोनाबाधित रुग्णांपैकी पाच जणांची प्रकृती बरी झाली आहे. त्यांना लवकरच सुटी देण्यात येणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. त्याचबरोबर महाराष्ट्रात आणखी तीन नवे रुग्ण सापडल्याचंही ते म्हणाले. यात पिंपरी चिंचवडमधील एका २४ वर्षीय तरुणाला करोनाचा संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे.
राज्यात पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील करोना बाधित रुग्णांचा वाढत चालला आहे. शुक्रवारी पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये करोनाचा संसर्ग झालेला प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. त्याबरोबर मुंबईतही एकाला लागण झाल्याचं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या आता ५२ झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात एका २४ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड शहरात करोना बधितांचा आकडा हा १२ वर पोहोचला आहे. तर पुण्यात आणखी रुग्ण सापडल्यानं पुण्यातील आकडाही दहावर गेला आहे. या दोन्ही रुग्णांना क्वारेंटाइनमध्ये ठेवलं जाणार आहे.
दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानले आहेत. एका पत्रकार परिषदेत बोलताना टोपे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरला करोनाचा संसर्ग झाला. संबंधित डॉक्टरनं स्वतःला होम क्वारेंटाइन करून घेतलं आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री टोपे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर टोपे म्हणाले,’करोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना संसर्ग होण्याची भीती असतेच. आज आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत, असं सांगत टोपे यांनी त्यांचे आभार मानले.





No comments

Powered by Blogger.