CoronavirusUpdate | जगभरात कोरोनाचा मृत्यूतांडव सुरूच

CoronavirusUpdate | जगभरात कोरोनाचा मृत्यूतांडव सुरूच
जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ झाली असून जगभरात एकूण 7 लाख 21 हजार 412 कोरोना बाधित आहेत. आतापर्यंत 33 हजार 956 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 51 हजार 4 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. इटलीमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 10 हजार 779 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये स्पेनचा दुसरा क्रमांकावर आहे.
 स्पेनमध्ये 6803 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काल स्पेनच्या राजकुमारी मारिया टेरेसा यांचाही मृत्यू झाला. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंमध्ये शाही परिवारातील हा पहिला मृत्यू होता. अमेरिकेतही कोरोनाचा हैदोस पाहायला मिळत आहे. अमेरिकेमध्ये आतापर्यंत 2484 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 1 लाख 42 हजार 47 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. सध्या जगभरातील जवळपास 177 देश कोरोनाच्या सावटाखाली आहेत. जाणून घेऊयात जगभरातील देशांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय स्थिती आहे त्याबाबत...
जगभरात असा फोफावत गेला कोरोना व्हायरस :

जानेवारी 19 : 100 रूग्ण
जानेवारी 24 : 1000 रूग्ण
फेब्रुवारी 12 : 50000 रूग्ण
मार्च 6 : 1 लाख रूग्ण
मार्च 18 : 2 लाख रूग्ण
मार्च 21 : 3 लाख रूग्ण
मार्च 24 : 4 लाख रूग्ण
मार्च 26 : 5 लाख रूग्ण
मार्च 28 : 6 लाख रूग्ण
मार्च 29 : 7 लाख रूग्ण



 संबंधित बातम्या पाहा

No comments

Powered by Blogger.