Coronavirus | राज्यात कोरोना संक्रमितांचा आकडा वाढतोय

Coronavirus | राज्यात कोरोना संक्रमितांचा आकडा वाढतोय
कोरोनाचे संकट आता शहरातून खेड्यापर्यंत पोहचलं आहे. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन कक्षामध्ये शनिवारी सकाळी ठेवण्यात आलेल्या एका 46 वर्षीय व्यक्तीचा अवघ्या तासाभरातच उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुलडाणा शहरातीलच एका खासगी रुग्णालयामध्ये गेल्या तीन दिवसांपूर्वी त्याच्यावर उपचार होते सुरू. त्याचा निमोनिया अधिक वाढत गेला. त्यामुळे त्याची प्रकृती ढासळली होती. परिणामी राज्यात आतापर्यंत बळींची संख्या आठ झाली आहे.

महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 196 झाली आहे. यामध्ये मुंबई व ठाणे परिसर 107, पुणे 37, नागपूर 13, अहमदनगर 03, रत्नागिरी 01, औरंगाबाद 01, यवतमाळ 03, मिरज 25, सातारा 02, सिंधुदुर्ग 01, कोल्हापूर 01, जळगाव 01, बुलढाणा 01असा तपशील आहे. राज्यातील मुंबई 14, पुणे 15, नागपूर 01, औरंगाबाद 01, यवतमाळ 03 असे 34 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. आत्ता 155 जणांवर उपचार सुरू आहेत. तर, देशात कोरोना बाधितांच्या संख्येने हजारचा टप्पा पूर्ण केला आहे. देशात आत्ताच्या घडीला 1050 कोरोनाचे रुग्ण आहेत. यात सर्वाधिक 196 महाराष्ट्रात आहे. त्याखालोखाल केरळमध्ये 182 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. यातून अत्यावश्यक सेवांना वगळ्यात आलं आहे.संबंधित बातम्या पाहा


No comments

Powered by Blogger.