कसे दिसतात कोरोना विषाणू? फोटो झाले प्रसिद्ध
चीनमध्ये उद्रेक झालेल्या कोरोना विषाणूनं जगभरात भीतीचं वातावरण तयार केलं आहे. जगातील तब्बल सत्तर देशामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून, चीनमध्ये २ हजार ९१२ लोक आतापर्यंत मरण पावले आहेत.

- जागतिक स्तरावर आरोग्य आणीबाणी लागू कराव्या लागलेल्या कोरोना विषाणूचे फोटो आता प्रसिद्ध करण्यात आले आहेत. अमेरिकेतील मोंटाना येथे असलेल्या राष्ट्रीय अॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग संस्थेने (The National Insitute of Allergy and Infectious Diseased -NIAID) वेगवेगळ्या अवस्थेतील विषाणूचे फोटो जारी केले आहेत. राष्ट्रीय अॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग संस्थेने प्रसिद्ध केलेलं कोरोना विषाणूचं छायाचित्र. हे छायाचित्र मायक्रोस्कोपच्या मदतीनं घेण्यात आली आहेत.
- चीनमध्ये हा विषाणू प्रथम संसर्गास कारण ठरला. गेल्यावर्षी डिसेंबरपासूनच या विषाणूचा संसर्ग चीनमध्ये सुरू झाला, त्यानंतर आतापर्यंत तो सत्तर देशात पसरला असून चीनमधील ८० हजार लोकांसह जगातील एकूण ८८ हजार लोकांना त्याचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जगभरातील सत्तर देशांत प्रसार झालेल्या या विषाणूमुळे गेलेल्या बळींची संख्या आता तीन हजारांवर गेली असून ८८ हजार लोकांना संसर्ग झाला आहे. राष्ट्रीय अॅलर्जी आणि संसर्गजन्य रोग संस्थेने प्रसिद्ध केलेलं कोरोना विषाणूचं छायाचित्र.

- चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने म्हटले आहे, की रविवारी २०२ नवीन रुग्ण आढळले असून एकूण संख्या ८०,०२६ झाली आहे. नवीन रुग्णांची संख्या २२ जानेवारीपासून प्रथमच कमी होताना दिसत आहे.
Post a Comment