शीना बोरा हत्याकांड | पीटर मुखर्जीला चार वर्षांनी जामीन मंजूर

शीना बोरा हत्याकांड | पीटर मुखर्जीला चार वर्षांनी जामीन मंजूर
शीना बोरा हत्याकांड प्रकरणात पीटर मुखर्जीला चार वर्षांनी जामीन मंजूर करण्यात आला आहे. पीटर मुखर्जी हा शीना बोरा हत्याकांड प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी एक आहे.मुंबई हायकोर्टाने ६ फेब्रुवारी रोजी पीटरला सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआयला सुप्रीम कोर्टात अपिल करता यावं यासाठी त्या निर्णयाला सहा आठवड्यांची स्थगितीही देण्यात आली होती.आज अखेर पीटरला जामिनावर सोडण्यात आलं आहे.
काय आहे प्रकरण?
ड्रायव्हर शामवर रायला जेव्हा बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी २०१५ मध्ये अटक झाली तेव्हा त्याने चौकशी दरम्यान शीना बोराच्या हाय प्रोफाईल मर्डर मिस्ट्रीचा खुलासा केला. त्याच्या जबाबानंतर इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि पीटर मुखर्जी या तिघांनाही अटक करण्यात आली. शीना बोरा ही इंद्राणी मुखर्जीची बहिण नसून मुलगी आहे हे सत्य पीटरला ठाऊक होते. तसेच पीटरला पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा राहुल आणि शीनाचे प्रेमसंबंध जुळले आहेत ही बाबही त्याला ठाऊक होती अशी माहिती विशेष सरकारी वकील भरत बदामी यांनी २०१९ मध्येच कोर्टात दिली आहे. शीना बोराचा शोध घेण्यासाठी पीटरने कोणतीही पावलं उचलली नाहीत. शीना कुठे आहे हे माहीत नसल्याचेच त्याने सातत्याने सांगितले.
शीना बोराची हत्या करण्यात आली तेव्हा आपण लंडनमध्ये होतो असं पीटरने वारंवार सांगितलं. मात्र सीबीआयने त्याचे हे म्हणणे मान्य केले नाही. तसंच २०१९ मध्ये एका सुनावणी दरम्यान कोर्टाने पीटरला सायलेंटर किलरही म्हटले होते. तसंच त्याचा जामीन वारंवार नाकारण्यात आला होता. आज अखेर त्याला जामीन मंजूर कऱण्यात आला आहे.
No comments

Powered by Blogger.