CoronoaVirus | ‘बेबी डॉल’ फेम गायिका कनिका कपूर ही भारतातील पहिली करोनाचा संसर्ग आणि ३५० ते ४०० लोकांच्या संपर्कात
![]() |
‘बेबी डॉल’ फेम गायिका कनिका कपूर ही भारतातील पहिली करोनाचा संसर्ग आणि ३५० ते ४०० लोकांच्या संपर्कात |
‘बेबी डॉल’ या सुपरहिट गाण्याने रातोरात प्रसिद्धीच्या शिखरावर
पोहोचलेली गयिका कनिका कपूरला करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.
‘रिपब्लिक वर्ल्ड’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार कनिका शुक्रवारी
लंडनहून लखनऊला परतली आणि वैद्यकीय तपासणीत तिला करोनाची लागण झाल्याचं
स्पष्ट झालं आहे.
लखनऊमध्ये चार जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. हे चारही जण करोना पॉझिटिव्ह आहेत. यात कनिकाचाही समावेश आहे.
लखनऊमध्ये कनिकाला आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं आहे. मीडिया
रिपोर्ट्सनुसार, कनिका कपूरने लागण झाल्याची गोष्ट लपवून ठेवली होती.
करोनाची लागण झाल्यानंतरही ती एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबली होती. इतकंच
नव्हे तर तिने डिनर पार्टीही ठेवली होती, असं म्हटलं जातंय.
कनिका ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका आहे. ‘बेबी डॉल’सोबतच तिने ‘बीट
पे बूटी’, ‘टुकुर टुकुर’ ही गाणी गायली आहेत. काही रिअॅलिटी शोमध्ये ती
परीक्षक होती.
कनिका लंडहून आल्यावर जवळपास ३५० ते ४०० लोकांच्या संपर्कात आली असल्याचे म्हटले जाते.
कनिका लंडनहून परत येताच तिने एका पार्टिला हजेरी लावली होती. दुष्यंत सिंग, वसुंधराराजेंसह बडे नेते-अधिकारी पार्टीत होते. ती जवळपास ३५० ते ४०० लोकांच्या संपर्कात आली होती. आता या सर्वांनी स्वत:चे विलगीकरण करुन घेतले आहे.
या पार्टीमध्ये राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे आणि त्यांचा
मुलगा दुष्यंत सिंह हे देखील उपस्थित होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी
दुष्यंत यांनी संसदेत हजेरी लावली. कनिकाची करोना चाचणी पॉझिटीव्ह झाल्याचे
कळताच शुक्रवारी वसुंधरा राजे आणि दुष्यंत यांनी स्वत:चे विलगीकरण करुन
घेतले आहे. त्यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली आहे.
काँग्रेस नेते जतिन प्रसाद आणि उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रकाश सिंह
हे देखील पार्टिला उपस्थित होते. त्यांनी सुद्धा स्वत:चे विलगीकरण
केल्याचे एएनआयने म्हटले आहे. तृणमूल काँग्रसचे आमदार डेरेक ओ ब्रायन हे
दोन तास दुष्यंत यांच्यासोबत असल्यामुळे त्यांनी १८ मार्च रोजी स्वत:चे
विलगीकरण करुन घेतले आहे.
अपना दल पक्षाच्या आमदार अनुप्रिया पटेल आणि भाजपाचे आमदार वरुण गांधी हे
देखील दुष्यंत यांच्या संपर्कात आले होते. म्हणून त्यांनी देखील स्वत:चे
विलगीकरण करुन घेतले आहे.
कनिका दहा दिवसांपूर्वी लंडनहून भारतात परतली आहे. पण तिला करोनाची लक्षणे
चार दिवसांपूर्वी दिसू लागल्याचे तिने म्हटले आहे. ‘सध्याच्या परिस्थित
तुम्ही सर्वांनी स्वत:चे विलगीकरण करण्याचा सराव करा आणि तुम्हाला काही
लक्षणे जाणवली तर तातडीने चाचणी करुन घ्या’ असे कनिकाने सोशल मीडिया
पोस्टमध्ये म्हटले आहे.
Post a Comment