जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी आता सकाळी अडीच तासांचाच वेळ - बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार

जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी आता सकाळी अडीच तासांचाच वेळ - बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार
जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी आता सकाळी अडीच तासांचाच वेळ असणार आहे. याबाबतचे सुधारित आदेश बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिले आहेत.
आदेशात म्हटले की, जिल्ह्यात संचारबंदी लागू आहे. यातून जीवनावश्यक वस्तूंच्या सर्व आस्थापना वगळण्यात आल्या होत्या. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आचारसंहिता शिथील काळात सकाळ सकाळी 11 ते 3 या वेळेत खुली राहत होती. आता याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी दिलेल्या सुधारित आदेशानुसार सकाळी 7 ते 9.30 या वेळेत दुकाने खुली राहणार आहेत. त्यामुळे खरेदीसाठी आता सकाळी वेळ निश्चित करुन देण्यात आली असून जमावबंदीचे उल्लंघन झाल्यास कारवाई होईल असे सांगण्यात आले आहे.


संबंधित बातम्या पाहा 

No comments

Powered by Blogger.