आजचे राशीभविष्य

मेष : हाती घेतलेल्या कामात यशस्वी व्हाल. प्रसिद्धीच्या झोतात याल. जोडीदाराच्या नव्या रूपाचे दर्शन होईल.
वृषभ : आयुष्यामध्ये भरभरून प्रेमाचा आनंद मिळेल. गैरसमज संपुष्टात येतील. संध्याकाळी आवडत्या कामात वेळ जाईल.

मिथुन : सकाळची सूर्यकिरणे मन प्रफुल्लीत करतील. वैवाहिक आयुष्यात सुखाचा झरा वाहील. घरातील वातावरण उत्साही असेल. 
कर्क : कल्पक बुद्धिमत्तेच्या जोरावर कामात यशस्वी व्हाल. सामाजिक बांधिलकी जपा. अनेक अडचणींवर मात करून यशाचे शिखर गाठाल.
सिंह : आगंतुक पाहुण्यांमुळे दिवसाचे वेळापत्रक कोलमडेल. कामामधील प्रामाणिकपणा जागृत ठेवा. आर्थिक विवंचना सतावेल.

कन्या : अपेक्षित भेटीगाठी होतील. सहकर्मचाऱ्यांचा सल्ला मोलाचा ठरेल. उपजत कलाकौशल्याला वाव मिळेल.

तुळ : मोठी बहीण अथवा भाऊ यांच्या मताला प्राधान्य द्याल. स्वयंसेवक म्हणून काम कराल. आधुनिक जीवनशैलीतील तोटा प्रकर्षाने जाणवेल.

वृश्चिक : सहकाऱ्यांकडून काम करून घेण्याची हातोटी वाखाणण्याजोगी असेल. भावनिक गुंतागुंत त्रासदायक होईल. गरिबांना जीवनावश्यक वस्तूंची मदत कराल.

धनु : उतावीळपणे गुंतवणूक केल्यास तोटा होईल. भावंडांमधील आपसातील वाद संपतील. वेळ हे प्रत्येक जखमेवर योग्य औषध असते.

मकर : प्रकृतीमान खालावेल. कर्ज घेतले असल्यास हप्ते वेळेत भरा. वेळेचा अपव्यय केल्यास व्यवसायातील प्रगती खुंटेल.

कुंभ : शांत राहिल्याने सर्व समस्या सोडवू शकाल. घरातील जादाची कामे कराल. ज्येष्ठ व्यक्तींना जुने मित्र भेटतील.

मीन : जवळचे नातेवाइक आर्थिक मदत करतील. बराच काळ न केलेली कामे आज हातासरशी निपटून घ्याल.

No comments

Powered by Blogger.