तबलीगी जमातच्या लोकांचे डॉक्टरांसोबत गैरवर्तन; मेडीकल स्टाफवर थुंकले

तबलीगी जमातच्या लोकांचे डॉक्टरांसोबत गैरवर्तन; मेडीकल स्टाफवर थुंकले
निझामुद्दीनमधून काढण्यात आलेले तबलीगी जमातीचे लोक त्यांच्या तपासणीसाठी आणि उपचारांसाठी डॉक्टरांना सहकार्य करत नसल्याचे समोर आले आहे. उत्तर रेल्वेचे सीपीआरओ दीपक कुमार यांनी या संदर्भात माहिती दिली. तुकलकाबाद येथे आयसलेशनमध्ये ठेवण्यात आलेले तबलीगी जमातीचे लोक डॉक्टरांसोबत गैरवर्तन करताना दिसत आहे.
तबलीगी जमातीचे लोक डॉक्टर आणि स्टाफवर थुंकल्याची धक्कादायक माहिती समोर आळी आहे. तसेच या लोकांकडून अनावश्यक गोष्टीची मागणी करण्यात येत आहे. दिल्लीतील मरकज खाली केल्यानंतर तबलीगी जमातीच्या १६७ लोकांना आयसोलेशन वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. यापैकी ९७ डीजेल शेड ट्रेनिंगमध्ये तर ७० आरपीएफ बॅरेकमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती दीपक कुमार यांनी सांगितले.
मेडीकल स्टाफसोबत गैरवर्तन तबलीगी जमातीचे लोक मेडीकल स्टाफला सहकार्य करत नसून उलट सेंटरमध्ये इकडे-तिकडे फिरण्यासोबतच अनावश्यक मागण्या करत आहेत. नको तिथे थुंकणे आणि मेडीकल स्टाफच्या अंगावर थुंकत असल्याचे समोर आले. थुंकल्यामुळे कोरोना व्हायरस पसरण्याचा धोका कित्येक पटीने वाढतो. अशा स्थितीत या लोकांकडून गैरवर्तन करण्यात येत आहे.
निझामुद्दीन येथील मरकज देशात कोरोनाचे केंद्र म्हणून समोर आले आहे. दिल्लीत बुधवारी ३२ रुग्ण कोरोना बाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी २९ रुग्ण तबलीगी जमातीतून आलेले आहेत.

No comments

Powered by Blogger.