ससून रुग्णालयाच्या विरोधात काँग्रेस नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
![]() |
ससून रुग्णालयाच्या विरोधात काँग्रेस नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र |
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारादरम्यान
हलगर्जीपणा करणाऱ्या ससून रुग्णालयाच्या 'डीन'वर आपत्ती व्यवस्थापन
कायद्याअंतर्गत कारवाई करा, अशी तक्रार काँग्रेस नेते अरविंद शिंदे यांनी
मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे तक्रार केली आहे. ससून रुग्णालयामध्ये
उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर योग्यरित्या उपचार केले जात नाही.
रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नातेवाईकांना क्वॉरंटाईन केले जात नाही.
कमी-जास्त झाले तर रुग्णाला इतर रुग्णालयात जाण्यास सांगतात, अशा अनेक
तक्रारी या पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या आहेत.
पुण्यात सर्वाधिक मृत्यू हे ससून रुग्णालयातच झाले आहेत.
लॉकडाऊन होऊन 19 दिवस झाले तरी ससून प्रशासनाला 11 मजली इमारत तयार असताना आयसोलेशन कक्ष तयार करता आला नाही. आपली जबाबदारी दुसऱ्या रुग्णालयावर टाकण्याचे काम हे रुग्णालय करत आहे, असा आरोप पुणे महापालिकेचे काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केलाय. कोरोनाबाधित रुग्णांकडे ससून रुग्णालयाचे डिन व्यवस्थित लक्ष देत नाहीत. ससून रुग्णालय प्रशासन पुणेकरांच्या जीवाशी खेळत आहे. ससून रुग्णालयाच्या डिन अजय चंदनवाले यांना समज देऊन तातडीने उपाययोजना करण्यात याव्या अन्यथा त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई तरी करण्यात यावी, अशी मागणी अरविंद शिंदे यांनी केली. सुरुवातीपासूनच ससून रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांची योग्य ती काळजी घेत नसल्याचा आरोप केला जात आहे. पुण्यात आतापर्यंत 31 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यात सर्वाधिक 23 ससून रुग्णालयातील रुग्णांचा मृत्यू झालाय.

Post a Comment