Global market | आशियाई शेअर बाजार ढेपाळला

Global market
Global market | आशियाई शेअर बाजार ढेपाळला
जगभरात मृत्यूतांडवासाठी कारणीभूत ठरलेल्या कोरोना व्हायरसनं आता अर्थव्यवस्था पोखरायला सुरुवात केली आहे. आठवड्याच्या सुरुवातीलाच कोरोनाचा परिणाम आशियाई बाजारात पाहायला मिळाला. SGX NIFTY वर आज 0.7 टक्क्यांनी दबाव दिसून आला. अमेरिकेत डाऊ मार्केटवर आज 300 अंकाचा दबाव निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील मार्केटवर विक्रमी साप्ताहिक वाढ पाहायला मिळाली. फेड बँकेने घेतलेल्या आर्थिक निर्णयाने आणि कोरोनाचा होणारा प्रसार कमी झाल्याने मार्केटमध्ये चांगले बदल पाहायला मिळाले.

मागच्या आठवड्यात शुक्रवारी अमेरिकेतील मार्केट बंद होतं. गेल्या संपर्ण आठवड्यात डाऊ मार्केट जवळपास 12 टक्के वधारेला पाहायला मिळाला. 2009 नंतर नॅस्डॅकमध्ये 10.6 टक्के वाढल्याने गेला आठवडा चांगला राहिला. अमेरिकेतील बेरोजगारीच्या आकड्यात वाढ झाल्याने 60 लाख लोक बेरोजगार झाले आहेत. दरम्यान फेडने कठोर आर्थिक पावलं उचलत 2.3 लाख करोडचं पॅकेजची घोषणा केली आहे.

दरम्यान तेल निर्यात करणाऱ्या सर्व देशांनी तेलाचं उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. किंमतींवर नियंत्रण मिळविण्यासाठी एक मे पासून दररोज 97 लाख बॅरलचे उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मेक्सिकोने एक लाख बॅरल उत्पादन कमी करण्यास सहमती दर्शविली आहे. सोन्याच्या किंमतीही वधारलेल्या दिसून आल्या. गेल्या सात वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. फेडकडून मिळालेल्या आर्थिक साहायत्तामुळे सोन्याच्या किंमती वाढलेल्या दिसून येत आहे.



संबंधित बातम्या

No comments

Powered by Blogger.