आजचे राशीभविष्य
मेष:-कामातील बदल समजून घ्या. कामाचा
व्याप वाढता राहील. मनावर फार ताण घेऊ नका. मानपमानाचे प्रसंग फार मनावर
घेऊ नका. आवडीच्या पदार्थांसाठी आग्रही राहाल.
वृषभ:-घराची दुरूस्ती काढाल. कामाच्या ठिकाणी चांगले
वातावरण राहील. काही नवीन संधी चालून येतील. तरुण वर्गाशी मैत्री कराल.
प्रापंचिक सौख्य उत्तम राहील.
मिथुन:-मित्र-मंडळींचा गोतावळा जमवाल. विश्वासू
लोकांकडेच मन मोकळे करावे. व्यावसायिक अडचणी दूर कराव्यात. सामाजिक कामाकडे
ओढ वाढेल. मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यावे.
कर्क:-घरात धार्मिक कार्यक्रम निघतील. चैनीच्या वस्तू
खरेदी कराल. कामाच्या ठिकाणी आपली आब राखून राहाल. पथ्य पाण्याकडे लक्ष
द्यावे. मानसिक सौख्य जपावे.
सिंह:-कामाच्या ठिकाणी व्याप वाढता राहील. योग्य वेळी
तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. व्यसनांपासून लांब राहावे. मित्रांची मदत
वेळेवर मिळेल. जोडीदाराकडून अपेक्षा वाढेल.
कन्या:-कोर्टाची कामे लांबणीवर पडतील. घरच्या मंडळींचे
सौख्य वाढेल. वादाचे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या
सुशिक्षितपणाचे कौतुक कराल. मनातील गैरसमज काढून टाकावेत.
तूळ:-एकमेकांच्या बाजू विचारात घ्याव्यात. आर्थिक
व्यवहार तज्ञांच्या सल्ल्याने करावा. राहत्या घराचे प्रश्न उभे राहतील.
मुलांच्या अडचणी समजून घ्याव्यात . घाई घाईने कोणतेही काम करू नका.
वृश्चिक:-तब्येतीत सुधारणा दिसून येईल. दगदग वाढली तरी
फळ चांगले मिळेल. मैत्रीत गैरसमज संभवतात. चांगल्या संगतीत राहावे. जवळचा
प्रवास काळजीपूर्वक करा.
धनू:-कामात इतरांची मदत घ्यावी लागेल. इतरांच्या
सल्ल्याने नवीन योजना आखाल. घराच्या दुरूस्तीचे काम निघू शकते. मनावर
काहीसे दडपण राहील. कामातून समाधान शोधावे.
मकर:-जोखमीचे व्यवहार सावधतेने करा. प्रेम प्रकरणात
जवळीक वाढेल. मुलांच्या समस्या सोडवाव्या लागतील. . सहकार्यांकडून कौतुक
केले जाईल. नवीन आर्थिक योजना आखाल.
कुंभ:-उष्णतेचे विकार संभवतात. कामाचा आलेख वाढता
राहील. क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. आपल्या बुद्धीचा कस लागू शकतो.
वरिष्ठांकडून प्रशंसा केली जाईल.
मीन:-सामाजिक कामातून ओळखी वाढतील. स्थावरचे व्यवहार
जमून येतील. मित्राची वेळेवर मदत मिळेल. मनावरील ताण कमी करण्याचं प्रयत्न
करा. जवळच्या व्यक्तीशी मनमोकळ्या गप्पा होतील.
-ज्योतिषी विद्याधर करंदीकर
Post a Comment