पाकच्या मौलाना तारिक जमील यांच कोरोनावर अजब तर्कट
![]() |
पाकच्या मौलाना तारिक जमील यांच कोरोनावर अजब तर्कट |
“महिलांच्या तोकड्या कपड्यांमुळे करोना पसरला” असा अजब दावा पाकिस्तानचे
कट्टरपंथीय मौलाना तारिक जमील यांनी केला आहे. “महिलांनी आजपर्यंत जी काही
दुष्कृत्यं केली आहेत त्यामुळेच जगाला करोना नावाची शिक्षा भोगावी लागली
आहे.” असंही जमील यांनी म्हटलं आहे. आश्चर्याची बाब म्हणजे जेव्हा हे
वक्तव्य मौलाना तारिक जमील यांनी केलं तेव्हा तिथे पाकिस्तानचे पंतप्रधान
इम्रान खानही उपस्थित होते.
कट्टरपंथीय मौलाना तारिक जमील यांनी शनिवारी एहसास टेलीथॉन फंड रेजिंग
कार्यक्रमात बोलताना हे वक्तव्य केलं आहे. “महिलांनी लहान आणि तोकडे कपडे
घातल्यानेच करोनाचा धोका निर्माण झाला आहे. महिलांच्या दुष्कर्माची शिक्षा
ही जगाला मिळाली आहे.” असंही ते म्हणाले आहेत.
पाकिस्तान मानवाधिकार आयोगने या वक्तव्यासंदर्भात मौलाना जमील यांनी माफी
मागण्यास सांगितले. मौलाना तारिक जमील यांनी केलेलं वक्तव्य हे त्वरित मागे
घ्यावं आणि अशा प्रकारची वक्तव्य करु नयेत जे वक्तव्य केलं आहे त्याबाबत
माफी मागावी असं पाकिस्तान मानवाधिकार आयोगाने म्हटलं आहे. मात्र, “मी
माफी मागणार नाही अशी भूमिका मौलाना तारिक जमील यांनी घेतली आहे.
पाकिस्तानातील काही प्रसारमाध्यमांनी माझ्या माफी संदर्भातलं वृत्त चालवलं
मात्र ते खोटं आहे. मी माफी मागणार नाही मी माझ्या मताशी आणि केलेल्या
वक्तव्याशी ठाम आहे” असंही त्यांनी म्हटलं आहे.
Post a Comment