करोना व्हायरसवर पुण्यात लस बनवण्याची योजना

करोना व्हायरसवर पुण्यात लस बनवण्याची योजना
पुणे स्थित सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या कंपनीची  करोना व्हायरस विरोधात लसची निर्मितीची योजना आहे. सिरम इन्स्टिटय़ूट परवडणाऱ्या दरात लस बनवण्यासाठी ओळखली जाते. या कंपनीने आतापर्यंत विविध आजारांवर लस बनवली आहे.
Covid-19 विरोधात बनवण्यात येणाऱ्या लसीची किंमत १ हजार रुपयांपर्यंत असू शकते. सिरम इन्स्टिटय़ूट ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत लस बनवण्याच्या प्रोजेक्टमध्ये सहभागी आहे. “चाचण्या यशस्वी झाल्या तर सप्टेंबर-ऑक्टोंबर पर्यंत ही लस बाजारात उपलब्ध होईल. १ हजार रुपयापर्यंत परवडणाऱ्या दरात ही लस उपलब्ध करुन देण्याचा आमचा प्रयत्न आहे” असे सिरम इन्स्टिटय़ूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला यांनी सांगितले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.
अवघ्या पाच रुपयात मिळते लस
सिरम इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया ही कंपनी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात लस उपलब्ध करुन देण्यासाठी ओळखली जाते. या कंपनीची वार्षिट उलाढाल अब्जावधीच्या घरात आहे. मागच्या काही वर्षात कंपनीने वेगाने प्रगती केली आहे. पुणे मांजरी येथे पूनावाला बायोटेक पार्कमध्ये जगातील सर्वात मोठे लस निर्मिती केंद्र सुरु करण्यासाठी कंपनीने ३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
सिरम इन्स्टिटय़ूटकडून युनिसेफ आणि पॅन अमेरिकन आरोग्य संघटनेला लसी पाठवल्या जातात. कंपनीच्या उत्पन्नात ८५ टक्के निर्यातीचा वाटा आहे. २०२२ पर्यंत १०० अब्ज डॉलर्सची उलाढाल करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. मागच्यावर्षी बिझनेस इनसायडरमध्ये ही माहिती प्रसिद्ध झाली होती.
सिरमच्या काही लसींची किंमत ही फक्त पाच रुपये आहे. एक कप चहाच्या किंमतीपेक्षाही लसींची किंमत कमी आहे. भारत सरकार, जागतिक आरोग्य संघटना, युनिसेफ आणि गावी हे कंपनीचे काही मोठे ग्राहक आहेत. सायरस पूनावाला यांचे सुपूत्र आदर पूनावाला सिरमचे सीईओ आहेत.
‘लसीमधून पैसा कमवण्याची ही वेळ नाही’
“करोना व्हायरसला रोखण्यासाठी बनवण्यात येणाऱ्या लसीमधून पैसा कमावण्याची ही वेळ नाही. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही लस पोहोचवणे, त्यांना ही लस उपलब्ध करुन देणे ही वेळेची गरज आहे” असे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदर पूनावाला म्हणाले. इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केले.

No comments

Powered by Blogger.