पालघर जमाव हत्याकांड याप्रकरणी 110 जणांना अटक
![]() |
पालघर जमाव हत्याकांड याप्रकरणी 110 जणांना अटक |
दरोडेखोर असल्याच्या संशयावरून शुक्रवारी रात्री गडचिंचले येथे तीन जणांची
हत्या केल्या प्रकरणी 110 आरोपींना कासा पोलिसांनी अटक केली होती. त्यापैकी
9 आरोपी 18 वर्षांखालील असल्याने त्यांना भिवंडीच्या बालसुधारगृहात
पाठविण्यात आले. तर अन्य 101 आरोपींना शनिवार, 18 एप्रिलला डहाणू कोर्टात
हजर करण्यात आले. त्यांना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर
काही आरोपी फरार असून त्यांचा शोध कासा पोलीस करीत आहे. तर, सारणी हल्ला
प्रकरणातील 13 जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्यांची रवानगी
ठाणे कारागृहात करण्यात आली आहे.
कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर देशात आणि राज्यात लॉकडाऊन आहे. या लॉकडाऊनच्या काळात पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही समाजकंटक चोर, दरोडेखोर येतात आणि किडन्या काढून नेतात अशा वेगवेगळ्या अफवा नागरिकांमध्ये पसरवत असल्याने धक्कादायक प्रकार घडत आहेत. याच अफवांमुळे जमावाने तीन जणांची हत्या केल्याचं काल उघड झालं होतं. या प्रकरणी आरोपींवर कलम 302, 120(ब)427, 147, 148, 149/307, 353, 333, 323, 341 कासा पोलीस ठाण्यात एकूण तीन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. 110 जणांना अटक करण्यात आली असून इतर 200 ते 300 जण फरार आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील कांदिवलीहून आपल्या गुरुचे निधन झाले म्हणून त्यांच्या अंत्यविधीसाठी सुशील गिरी महाराज (35), चिकणे महाराज (70) आणि चालक निलेश तेलगडे (30) इको कारने सूरतकडे निघाले होते. त्यांच्याकडे कोणताही पास नसल्याने त्यांना चारोटी टोलनाका येथे पोलिसांनी माघारी पाठवले. परंतु, त्यांना सूरत गाठायचंच होतं म्हणून ते माघारी फिरून आड मार्गाने विक्रमगडहून जव्हार-दाभाडीमार्गे दादरा नगर हवेलीच्या हद्दीवर असलेल्या डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे रात्री 9.30 वाजेच्या सुमारास पोहचले.

मात्र, त्याठिकाणी वनविभागाच्या चौकीजवळ असलेल्या जमावाने या तिघांची गाडी अडवली आणि चोर समजून दगड, कोयते, काठ्यांनी मारण्यास सुरुवात केली. त्यांच्यासह त्यांची कार पलटी केली. तेथे असलेल्या गार्डने प्रसंगावधान राखून पोलिसांना सूचना दिली. त्यामुळे तात्काळ 10.30 वाजेच्या सुमारास पोलीस आपल्या गाडीसह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या तिघांना कारमध्ये बसवून जखमी अवस्थेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, जमाव शेकडोंच्या संख्येने असल्याने चार पोलिसांचे काहीच चालले नाही. यावेळी पोलिसांबरोबर असलेल्या जिल्हा परिषद सदस्य काशीनाथ चौधरी यांनीही जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी या तिघांना कसंबसं आपल्या गाडीत बसवले.
Post a Comment