तुमची ‘सोनिया सेना’ झाल्यापासून तुमचं हिंदुत्व नकली झालंय !!
![]() |
तुमची ‘सोनिया सेना’ झाल्यापासून तुमचं हिंदुत्व नकली झालंय |
महाराष्ट्रातील पालघर येथील साधूंच्या हत्येची घटना ताजी असतानाच उत्तर
प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात पुन्हा दोन साधूंची हत्या करण्यात आल्याची
खळबळजनक घटना घडली आहे. गावातील मंदिरात दोन साधूचे मृतदेह आढळून आल्यानंतर
हा प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, उत्तर
प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यावर
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेला धार्मिक रंग चढवू नका असं
आवाहन केलं आहे. तर दुसरीकडे महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि भाजपा
नेत्या विजया रहाटकर यांनी तुमची ‘सोनिया सेना’ झाल्यापासून तुमचं हिंदुत्व
नकली झालंय, असं म्हत संजय राऊत यांना टोला लगावला.
“उत्तर प्रदेशातील साधूंच्या हत्येची इतकी चिंता? कदाचित पालघर मधील
साधूंच्या मॉब लिंचिंगचीही अशी चिंता झाली असती. उत्तर प्रदेशातील
हत्येबद्दल बोलत आहात. परंतु पालघरमधील प्रकरणावर का शांत होता. त्यावेळी
एकही शब्द काढला नाही. तुमची ‘सोनिया सेना’ झाल्यापासून तुमचं हिंदुत्व
नकली झालंय,” असं म्हणत रहाटकर यांनी राऊत यांना टोला लगावला. त्यांनी
ट्विटरवरून राऊतांवर निशाणा साधला.
काय म्हणाले राऊत ?
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये एका मंदिरात दोन साधूंची हत्या करण्यात आली हे भयानक आहे. पालघरमध्ये घडलेल्या घटनेला ज्याप्रकारे काही लोकांनी धार्मिक रंग चढवण्याचा प्रयत्न केला होता, तसा या घटनेला धार्मिक रंग देऊ नका, असं संजय राऊत म्हणाले. त्यांनी ट्विटरवरून आपलं मत व्यक्त केलं होतं.

Post a Comment