राज्यातील पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्यांची केंद्राकडे मागणी : गृहमंत्री
![]() |
राज्यातील पोलिसांच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्यांची केंद्राकडे मागणी : गृहमंत्री |
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस
दल अहोरात्र कार्यरत आहे. त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा भार पडत आहे. कायदा व
सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस दलाच्या मदतीसाठी केंद्रीय सशस्त्र पोलीस
दलाच्या (CAPF) वीस कंपन्या म्हणजेच 2000 केंद्रीय पोलिसांची मागणी
केंद्राकडे करण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली
आहे. गृहमंत्र्यांनी यासंदर्भात ट्विटरवर व्हिडीओ शेअर केला आहे.
"कैक पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
त्यांच्या कामाची वेळ आणि आव्हानंही दिवसागणिक वाढत आहेत. शिवाय रमजान ईदही
येऊ घातली आहे. म्हणूनच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्याने तातडीने
केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्यांची मागणी केंद्राकडे केली आहे,"
असं अनिल देशमुख म्हणाले.
सध्या राज्य राखीव पोलीस दल अर्थात
सीआरपीएफच्या 32 कंपन्या पोलीस दलाच्या मदतीला आहेत. मात्र सततच्या
कामाच्या ताणामुळे पोलिसांनाही विश्रांतीची गरज आहे. ही बाब लक्षात घेता
राज्यात तातडीने केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या 20 कंपन्या मिळाव्यात, अशी
मागणी केल्याचं देशमुख यांनी सांगितलं.
Post a Comment