गरीब देशांचं कर्ज माफ करावं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जगभरातील 300 लोकप्रतिनिधींची मागणी

गरीब देशांचं कर्ज माफ करावं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जगभरातील 300 लोकप्रतिनिधींची मागणी
कोविड 19 अर्थात महामारीच्या संकटाचा विचार करता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने गरीब देशांचं कर्ज माफ करुन टाकावं,  अशी विनंती जगभरातील 300 लोकप्रतिनिधींनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीला (International Monetary Fund) केली आहे. 2016 साली अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार शर्यतीत असणारे बर्नी सँडर्स आणि इल्हाम ओमर यांनी या कामासाठी पुढाकार घेतला आहे.

जगात कोरोनाचं थैमान सुरु आहे. लॉकडाऊनमुळे अनेक देशातील सगळे व्यवसाय, दैनंदिन जीवन ठप्प आहे , जगाची अर्थव्यवस्था संकटात सापडली आहे. यात गरीब सर्वात जास्त भरडला जात आहे. त्यातही गरीब देशांचे जास्त हाल आहेत. कुचकामी आरोग्य व्यवस्था, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली अर्थव्यवस्था यातून फार पर्याय शिल्लक नाहीत त्यामुळे त्यांचं कर्ज माफ करावं अशी मागणी केली जात आहे.

हातात असलेला पैसा कर्जाचे हफ्ते फेडण्यात घालवण्यापेक्षा आपल्या जनतेची काळजी घेण्यासाठी खर्च होणं जास्त गरजेचं असल्याचं बर्नी सँडर्स यांनी म्हटलं आहे. कोरोनाचा धोका जगभरातील लाखो-कोटी लोकांना आहे. यामुळं गरीबी वाढणार आहे तसंच बेरोजगारी वाढणार आहे. यामुळं अनेकांच्या एकवेळचा जेवणाचा प्रश्नही वाढणार आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक किंवा इतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी किमान अशा गरीब देशांचं कर्ज माफ करुन आपला छोटासा वाटा उचलायला हवा असं मत त्यांनी मांडलंय.

गरीब देशांनी शक्य ती मदत पुरवायचा प्रयत्न असेल मात्र कर्ज माफ केलं तर त्या देशांचीच आर्थिक पत, रेटिंग घसरेल आणि त्यांना अत्यल्प दरात निधी उपल्ब्ध करुन द्यायला मर्यादा येतील असं आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटलं आहे.

No comments

Powered by Blogger.