रेल्वे स्टेशनच्या काउंटरवर उद्यापासून तिकीटाचे आरक्षण करता येणार

लॉकडाऊनमुळे रेल्वे स्टेशनवरील तिकीट बुकींग बंद करण्यात आले होते. करोना
व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. सध्या ज्या
विशेष ट्रेन सुरू आहेत त्यांच्यासाठीही रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकींग सुरू
केले आहे. आता रेल्वे स्टेशनवरील काउंटरवरूनही आरक्षण करता येणार आहे. पण
रेल्वेच्या काउंटरवर आरक्षणाची ही सुविधा मोजक्याच रेल्वे स्थानकांवरच
उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्थलांतरी मजुरांसाठी १ जूनपासून दररोज
धावणाऱ्या २०० अतिरिक्त ट्रेनसाठी आरक्षणांची ही सुविधा देण्यात आली आहे.
प्रवाशांना शुक्रवारपासून रेल्वे स्टेशनवरील काउंटववरून आरक्षण करता येणार आहे. प्रवाशांना रेल्वे स्टेशन आणि रेल्वे परिसरातील काउंटरवरून आरक्षण करता येईल. पण तिकीट बुकींगसाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क आवश्यक असणार आहे, असं रेल्वेने स्पष्ट केलं आहे.
पोस्ट ऑफिसमधूनही प्रवाशांना तिकीटाचे आरक्षण करता येणार आहे. तिकीटाचे आरक्षण आणि तिकीट रद्द करण्याची सुविधाही पोस्ट ऑफिस आणि प्रवासी सुविधा केंद्र (YTSK) यांना देण्यात आली आहे. या शिवाय IRCTC चे अधिकृत एजंट आणि रेल्वे परिसरातील पॅसेंजर रिझर्वेशन सिस्टीम (PRS) आणि कॉमन सर्व्हिस सेंटरवरही तिकीटाचे आरक्षण करता येणार आहे, असं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.
१ जूनपासून स्थलांतरीत मुजरांसाठी अतिरिक्त २०० ट्रेन
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांसाठी येत्या १ जूनपासून दररोज २०० अतिरिक्त ट्रेन चालवण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली. यासाठी आज सकाळी १० वाजेपासून ऑनलाइन तिकीट बुकींग सुरू झाले. या गाड्यांमध्ये एसी आणि जनरल डबेही असणार आहेत. तिकीट कन्फर्न न झालेल्यांना रेल्वेतून प्रवासाची परवानगी नाहीए. आता या गाड्यांचे स्टेशनवरील काउंटवरही आरक्षण करण्यात येणार असल्याने मजुरांना दिलासा मिळाला आहे.
खालील रेल्वे स्टेशनच्या काउंटरवर आरक्षण करता येणार.... वाचा

महाराष्ट्रात जिल्ह्यांतर्गत प्रवास नाही
महाराष्ट्रात राज्य सरकारने जिल्ह्यांतर्गत प्रवास बंदी केली आहे. यामुळे महाराष्ट्रात प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी तिकीट काढले असतील तर त्यांचे पूर्ण पैसे रेल्वेकडून दिले जातील, असं रेल्वे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. यामुळे महाराष्ट्राबाहेर जाणाऱ्यांनाच आरक्षण करता येणार आहे.

railway booking counters

Post a Comment