पुण्यात पॅरोलवर सुटलेल्या कैद्याची कोयत्यानं वार करून हत्या


पुण्यात येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या एका कैद्याचा कोयत्याने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे येरवडा परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नितीन शिवाजी कसबे (वय 24 रा. येरवडा) असे खून झालेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी पाच ते सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा भागातील शादलबाबा चौकाच्या इथे बुधवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास  नितीन शिवाजी कसबे हा चारजणांसोबत पायी चालत जात होता. त्याचदरम्यान कुणाल चांदणे आणि आकाश कानचिले याच्यासह दहा ते १२ जणांनी नितीनवर कोयत्याने हल्ला केला. यामध्ये नितीन गंभीर जखमी झाला. त्यानंतर तात्काळ रूग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. याप्रकरणी 5 ते 6 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे येरवडा पोलिसानी माहिती दिली.  तसेच नितीन शिवाजी कसबे आणि कुणाल चांदणे, आकाश कानचिले यांच्यात पूर्वी देखील भांडणे झाली होती. यातूनच हा प्रकार घडला असल्याची माहिती पुढे येत आहे.

No comments

Powered by Blogger.