Today Horoscope 25 May


मेष : कुटुंबीय आणि मित्रांबरोबर आनंदी क्षण घालवाल. वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस. तुम्हाला आज वेगळा अनुभव मिळणार आहे.

वृषभ : कलात्मक क्षेत्रातील लोकांना आजचा दिवस यशदायी ठरेल. अनेक माध्यमांतून आर्थिक लाभ होतील. स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल.
मिथुन : प्रवास फायदेशीर; पण महाग ठरेल. अतिशय प्रभावी व्यक्तीच्या पाठिंब्यामुळे तुमचे मनोधैर्य उंचावेल. प्रलंबित येणी प्राप्त होतील.

कर्क : आज तुम्ही केलेल्या कृतीमुळे अपेक्षेबाहेर फायदा होईल. थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. भांडण आज सोडवा.

सिंह : आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. योगासने व ध्यानधारणा यांमुळे मानसिकदृष्ट्या सक्षम राहाल. अति खर्च करणे टाळा.

कन्या : आजचा दिवस उच्च कामगिरीचा आहे. बाहेरील उपक्रम लाभदायक ठरतील. प्रेमामध्ये घाईगडबडीने कोणतेही पाऊल ‌उचलू नका.

तुळ : स्थावर मालमत्तेतील गुंतवणूक लाभाची ठरेल. नवीन नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे असतील. खासगी घडामोडी संपूर्ण नियंत्रणाखाली राहतील.

वृश्चिक : अत्यंत काळजीपूर्वक वागण्याचा दिवस. नव्या आर्थिक करारांना चालना मिळेल. योगसाधनेची मदत घ्या.

धनु : आर्थिक अडचणीवर मात करणे शक्य. तुमच्या खेळकर स्वभावामुळे सभोवतालचे वातावरण प्रसन्न बनेल. प्रेमामुळे आयुष्य मोहरून जाईल.

मकर : आपल्या उदार स्वभावाचा फायदा मित्रांना घेऊ देऊ नका. व्यवसायात फसवले जाण्याची शक्यता. प्रवास पुढे ढकलावे लागतील.

कुंभ : आजचा दिवस अत्यंत महान आहे. तुम्हाला आर्थिक फायदा संभवतो. उत्साहपूर्ण नवीन परिस्थितीचा अनुभव घ्याल.

मीन : वयोवृद्ध नातेवाइक अवाजवी मागणी करण्याची शक्यता आहे. जोडीदारावर नाराज असाल. आध्यात्मिक प्रगती होईल.

No comments

Powered by Blogger.