मेष:- जलद गतीने कामे कराल. सतत आपले अस्तित्व दाखवाल. सरकारी कामात यश येईल. मनातील इच्छा पूर्ण होईल. तुमची समाजप्रियता वाढेल.
वृषभ:- तुमचे अंगीभूत गुण दिसून येतील. चांगल्या बोलण्याने व्यावसायिक
मान मिळवाल. सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. चैनीच्या वस्तू गोळा कराल.
लिखाणाला प्रसिद्धी मिळेल.
मिथुन:- मनाची विशालता दाखवाल. वाचनाची आवड पूर्ण कराल. कलेला पोषक वातावरण मिळेल. सहृदयतेने वागाल. अचानक धनलाभ संभवतो.
कर्क:- जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. मुलांच्या प्रशिक्षणाकडे लक्ष
द्यावे. खर्चाच्या बाबतीत अविचाराने निर्णय घेऊ नका. रेस, सट्टा यांची आवड
पूर्ण कराल. कामातील विलंब टाळावा.
सिंह:- वैवाहिक सौख्यात भर पडेल. घरातील शांतता महत्त्वाची आहे. स्थावरची
कामे पूर्णत्त्वाला जातील. कामाचे समाधान लाभेल. भावंडांची काळजी लागून
राहील.
कन्या:-कर्तुत्वाला चांगला वाव मिळेल. आपल्याच मतावर
आग्रही राहाल. नातेवाईकांची मदत घेता येईल. भावनेतून मनाचे शुद्ध रूप
दर्शवावे. खाण्या-पिण्याच्या सवयी लक्षात घ्याव्यात.
तूळ:- सर्जनशीलतेने वागाल. आत्मिक समाधान मिळवण्याचा प्रयत्न कराल.
कलेला पोषक वातावरण मिळेल. मित्रपरिवार जमवाल. गप्पा-गोष्टी करण्यात वेळ
घालवाल.
वृश्चिक:- घरासाठी सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. आपल्या प्रांजल स्वभावाची
चुणूक दाखवाल. बागकामाची हौस भागवाल. महिलांना उत्तम गृहिणीपदाचा मान
मिळेल. घरात समाधान निर्माण कराल.
धनू:- आनंदीवृत्तीने वागाल. वाचनाची आवड पूर्ण करता येईल. इतरांचे भरभरून कौतूक कराल. आध्यात्मिक बळ वाढेल. यशाची वाट मोकळी होईल.
मकर:- बोलण्याने इतरांवर चांगली छाप पाडाल. क्षुल्लक कमतरता भरून निघेल.
गायन कलेला उठाव मिळेल. मौल्यवान वस्तू खरेदी कराल. आवडते खाद्य पदार्थ
खाल.
कुंभ:- तुमचे व्यक्तिमत्व खुलून येईल. सर्वांशी मधूर वाणीने बोलाल. नवीन
गोष्टींकडे ओढ वाढेल. प्रत्येक गोष्टीचा मनापासून आनंद घ्याल. उत्तम मैत्री
लाभेल.
मीन:- यशाची नवीन पायरी गाठता येईल. मोठ्या लोकांच्या ओळखीतून कामे
करावीत. गप्पिष्ट लोकांच्यात वावराल. मुलांकडून आनंद वार्ता मिळतील. मनातील
इच्छा पूर्ण होईल.– ज्योतिषी विद्याधर करंदीकर
Post a Comment