मुंबई हल्ल्यात जखमी झालेल्या कमांडो सुरेंद्र यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट
![]() |
मुंबई हल्ल्यात जखमी झालेल्या कमांडो सुरेंद्र यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट |
दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना एक वेगळी बातमी आली
आहे. दिल्ली कँटोन्मेंटचे विद्यमान आमदार असलेले कमांडो सुरेंद्र सिंह
यांना त्यांच्या आम आदमी पक्षाने (आप)तिकीट नाकारलं. आता या कमांडो
सुरेंद्र यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. हे विद्यमान
आमदार आता NCP च्या तिकिटावर दिल्लीची निवडणूक लढवणार आहेत.
कमांडो
सुरेंद्र 'आप'च्या वतीने 2013 आणि 2015 च्या निवडणुकीच्या रिंगणात होते.
दोन्ही वेळेला ते दिल्ली कँटोन्मेंटमधून आमदार म्हणून निवडून आले.
हरियाणाच्या झज्जरमध्ये मूळ गाव असलेले सुरेंद्र यांचा मुंबईशी संबंध आहे
आणि त्याचमुळे कदाचित शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने त्यांना या वेळी
उमेदवारी जाहीर केली आहे.
कमांडो
सुरेंद्र NSG मध्ये कार्यरत होते. नॅशनल सिक्युरिटी गार्ड अर्थात NSG
कमांडो म्हणून ते 2008 मध्ये मुंबईत तैनात होते. त्या वेळी अजमल कसाब आणि
इतर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईतवर हल्ला केला होता. दहशतवाद्यांशी दोन
हात करताना कमांडो सुरेंद्र जखमी झाले होते. त्यानंतर त्यांनी NSG मधून
निवृत्ती घेतली. कमांडो सुरेंद्र यांना आपलं पेन्शन मिळवण्यासाठी मोठा लढा
द्यावा लागला होता. त्याच वेळी ते अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)
यांच्या संपर्कात आले. केजरीवाल यांनी कमांडो सुरेंद्र यांना आम आदमी
पक्षाचे संस्थापक सदस्य करून घेतले. 2013 मध्ये त्यांना आपची उमेदवारीही
मिळाली आणि ते जिंकून आले. 2015 च्या निवडणुकीतही सुरेंद्र यांना त्याच
दिल्ली कँटमधून उमेदवारी मिळाली. ते पुन्हा आमदार झाले. या वेळी मात्र
अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने 15 विद्यमान आमदारांचं तिकीट कापलं. त्यात
कमांडो सुरेंद्र यांचाही समावेश होता.
Post a Comment