गॅस गिझरनंतर आता गॅस हिटरने घेतला 8 जणांचा बळी

गॅस गिझरनंतर आता गॅस हिटरने घेतला 8 जणांचा बळी
केरळमधील 8 जणांचे मृतदेह नेपाळच्या एका रिसॉर्टमध्ये सापडल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पर्यटनासाठी नेपाळला गेलेल्या 8 पर्यटकांचे मृतदेह नेपाळमधील दमन इथल्या एका रिसॉर्टमध्ये आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी घटनेची माहिती घेत असल्याचं सांगितलं आहे.

नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेले आठ भारतीय हॉटेलच्या रुममध्ये मृतावस्थेत सापडले आहेत. दामन येथील एका हॉटेलमध्ये हे भारतीय मुक्कामासाठी उतरले होते. हे सर्व भारतीय पर्यटक केरळचे आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, केरळमधील काही लोक पर्यटनासाठी नेपाळला गेले होते. त्यातील 8 जणांचा मृत्यू झाला आहे. रिसॉर्टमध्ये असलेल्या गॅस हिटरमुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.

No comments

Powered by Blogger.