ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे 'क्वीन काऊंसिल' नियुक्ती
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची
ब्रिटनच्या महाराणीचे कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे 'क्वीन काऊंसिल'
म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
![]() |
ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे 'क्वीन काऊंसिल' |
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे 'क्वीन काऊंसिल' म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ब्रिटनच्या न्यायमंत्रालयाने 13 जानेवारी रोजीच नव्या नियुक्त्यांसंदर्भातील यादी प्रसिद्धीस दिली असून, त्यामध्ये साळवे यांच्या नावाचाही समावेश आहे. साळवे यांनी केवळ एक रुपया फी घेऊन कुलभूषण जाधवांची बाजू आंतरराष्ट्रीय कोर्टात मांडली होती.
बॅरिस्टर हरीश साळवे हे आंतरराष्ट्रीय न्यायालयात भारताची बाजू भक्कम करणारं हे नाव. देशातल्या सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्वांमध्ये समाविष्ट असलेलं नाव. हरीश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. यांना वकिलीचं बाळकडू घरातूनच मिळालं. साळवे यांचे आजोबा पी. के. साळवे हे प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. तर त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. साळवे यांचे वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते.
हरीश साळवे हे वकिली करण्याआधी सीए झाले. पण प्रख्यात वकील नानी पालखीवाला यांच्यामुळे प्रभावित झालेल्या साळवे यांनी सीए झाल्यानंतर वकिलीची डिग्री मिळवली.
- 1980 मध्ये जे. बी. दादाचंदजी आणि कंपनी यांच्याकडे साळवे यांनी इंटर्नशिप केली.
- 1980 ते 1986 दरम्यान साळवे यांनी अटॉर्नी जनरल सोली सोराबजी यांच्यासोबतही काम केलं.
- हरीश साळवे यांनी सर्वात आधी सर्वोच्च न्यायालयात अँटी डम्पिंग केस लढली.
- कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वादाची केसही साळवे यांनीच अंबानींच्या बाजूने लढली होती.
- टाटा ग्रुपच्या अनेक खटल्यांची जबाबदारीही साळवे यांनी पेलली होती.
- भारत सरकारसोबतच्या कराच्या वादातही साळवे यांनी व्होडाफोनची बाजू मांडली.
- सलमान खानच्या हिट अँड रन प्रकरणातही साळवे यांनी सलमानची केस लढली.
त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना फाईव्ह स्टार्स हॉटेल्स आणि फर्स्ट क्लास एअर तिकीट्स बुक करावी लागतात अशीही ख्याती आहे.
Post a Comment