जॅकी श्रॉफचं चॅलेंज कॉमेडी किंग कपिल शर्माने पूर्ण केलं

http://www.esuper9.com/2020/01/comedy-king-kapil-sharma-completed-challenge.html
जॅकी श्रॉफचं चॅलेंज कॉमेडी किंग कपिल शर्माने पूर्ण केलं

कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये नुकतेच अभिनेते जॅकी श्रॉफ येऊन गेले. जॅकी आणि कपिलच्या गप्पांनी हा शो चांगलाच रंगला होता. दरम्यान जॅकी यांनी जाता जाता कपिलला एक अनोखं चॅलेंज दिलं. जॅकी यांनी कपिलला त्याच्या घरी एक रोप लावायला सांगितलं. एवढंच नाही तर रोप लावल्यानंतर अजून तीन जणांना या चॅलेंजमध्ये टॅग करून त्यांनाही रोप लावण्याचा सल्ला द्यायला सांगितला.

कपिल शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला. यात तो घरी एक रोप लावताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिलेल्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, "धन्यवाद जग्गू दादा, या सुंदर चॅलेंजसाठी आणि आम्हा सर्वांना झाडं लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी. मी आता हे चॅलेंज अक्षय कुमार, अजय देवगण आणि वरुण धवनला देत आहे."

No comments

Powered by Blogger.