महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षपदी सायली संजीव

'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीव हिची महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षपदी सायली संजीव
'काहे दिया परदेस' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सायली संजीव हिची महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी ट्विट करत तिनं याबद्दल माहिती दिली.

सायलीला अभिनयाव्यतीरिक्त राजकारणातही रस असल्याचं तिनं अनेकदा सांगितलं होतं. ती अनेक सामाजीक उपक्रामातही सहभाग घेत असते. तिनं अभिनयासोबत आतापर्यंत केलेल्या सामाजिक कामाची दखल घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपट कर्मचारी सेनेच्या उपाध्यक्षपदी तिची नेमणूक केली आहे. सेनेचे अध्यक्ष अमित खोपकर यांनी तिला या नियुक्तीचं अधिकृत पत्र दिलं.

 

No comments

Powered by Blogger.