शेतकरी कर्जमाफीमुळे 51 हजार कोटी भुर्दंड

शेतकरी कर्जमाफीमुळे 51 हजार कोटी भुर्दंड

गेल्या दहा वर्षात अनेक राज्यांनी कर्जमाफी केल्या, त्याची एकत्रित रक्कम ४ लाख २० हजार कोटी गेली आहे. कर्जमाफीची सवय शेतकऱ्यांना लागली असून देशातील बुडीत कृषी कर्जाचा आकडा १ लाख १० हजार कोटींवर गेला (१२.४ टक्के) आहे. तुलनेत उद्योगांचे बुडीत कर्ज ५ लाख ७० हजार कोटीवर आहे. महाराष्ट्रात दोन वर्षात दोन वेळा शेतकरी कर्जमाफी जाहिर झाली. याचा फटका राज्याच्या तिजोरीला बसला आहे. २०१६-१७ मध्ये राज्याची महसुल तूट -०.१ होती. ती २०१९-२० मध्ये ०.७ पोचली. तर १.० असणारी राजकोषीय तूट २.० पोहोचल्याचे या अहवालात म्हटले आहे. कर्जमाफीमुळे बुडीत कर्जे वाढत असून नवे कर्जदार निराश होत आहेत, वित्तीय शिस्त बिघडत असून त्याचा फटका कृषी उत्पादनाला बसल्याचे अहवालात म्हटले आहे. देशात कृषी कर्जे बुडीत जाण्याचे सर्वाधिक प्रमाण बँक आॅफ इंडियाचे (१६.९ टक्के) आहे.
राज्ये कृषी कर्जमाफी जाहीर करतात, पण अर्थसंकल्पात तरतूद करत नाहीत, असा ठपका या अहवालात आहे. फडणवीस सरकारने २०१७-१८ मध्ये ३४ हजार २०० कोटींची कृषी कर्जामाफी जाहीर केली. त्या तुलनेत २०१७ मध्ये १५ हजार २० कोटी आणि २०१८ मध्ये ६ हजार ५०० कोटी इतकी अर्थसंकल्पात तरतूद केल्याचे हा अहवाल म्हणतो. एकूण, एसबीआयच्या या अहवालाने कृषी कर्जमाफीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले असून कर्ज व्यवस्था व कृषी उत्पादनावर कर्जमाफीचा परिणाम होत असल्याचे उघड केले आहे.
महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफीत ९० लाख शेतकरी पात्र ठरतील, त्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा काही प्रमाणात लाभ होईल आणि ३६ लाख शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त होतील. यासाठी शासनाला ४५ ते ५१ हजार कोटी भुर्दंड येईल, असा अंदाज स्टेट बँक आॅफ इंडियाच्या अहवालात काढण्यात आला आहे. तसेच गेल्या दहा वर्षांमध्ये बुडीत कृषी कर्जाची रक्कम १लाख १० हजार कोटींवर गेली असून उद्योगांच्या बुडीत कर्ज ५ लाख ७० हजार कोटींवर गेले असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
अहवालात शेतकरी कर्जमाफीवर टिका करण्यात आली आहे. कर्जमाफीमुळे कर्ज संस्कृतीवर गंभीर परिणाम होत आहे. तसेच ऋणग्रस्तेत वरचेवर वाढ होत असून बँकांचे बुडीत कृषी कर्जाचे प्रमाण वाढत आहे. व त्याचा फटका कृषी उत्पादनाला बसतो आहे, असा निष्कर्ष या अहवालात आहे.


४४ लाख शेतकऱ्यांना काही प्रमाणात लाभ 
फडणवीस कर्जमाफी : एकूण शेतकरी १३४ लाख. ९० लाख शेतकरी कर्जदार होते. ८९ लाख शेतकरी कर्जमाफीस पात्र होते. ४४ लाख शेतकऱ्यांना काही प्रमाणात कर्जमाफीचा लाभ झाला. ३६ लाख शेतकरी कर्जमुक्त झाले. प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावरचे ७७ हजार ३१८ रुपयाचे कर्ज दूर झाले. ही कर्जमाफी ३४ हजार २० कोटींना पडली.

  • ठाकरे कर्जमाफी : एकूण शेतकरी १३७ लाख. ९२ लाख शेतकरी कर्जदार आहेत. ९० लाख शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत. ४४ लाख शेतकऱ्यांना काही प्रमाणात कर्जमाफीचा लाभ होईल. ३६ लाख शेतकरी कर्जमुक्त होतील. प्रत्येक शेतकऱ्याच्या डोक्यावरचे १ लाख २ हजाराचे कर्ज दूर होईल. ही कर्जमाफी ४५ ते ५१ हजार कोटींना पडेल.
  •  

No comments

Powered by Blogger.